Dairy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Farming : जातिवंत, दुधाळ गायींच्या पैदासाचे यश

Diwali Ank 2024 : साधारणपणे २०१९ मध्ये पंजाब मधील ‘प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन’च्या धर्तीवर महाराष्ट्रातील ११० अभ्यासू पशुपालक आणि ४५ पशुतज्ज्ञ एकत्र आले

अमित गद्रे

Livestock Management : साधारणपणे २०१९ मध्ये पंजाब मधील ‘प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन’च्या धर्तीवर महाराष्ट्रातील ११० अभ्यासू पशुपालक आणि ४५ पशुतज्ज्ञ एकत्र आले आणि त्यांनी प्रति वेत सरासरी ८५०० ते १०,००० लिटर दुग्धोत्पादन देणाऱ्या जातिवंत, दुधाळ, निरोगी होल्स्टिन फ्रिजियन गायीची पैदास स्वतःच्या गोठ्यात करण्याचे निश्‍चित केले.

यामध्ये प्रामुख्याने किमान १० ते ४० गायींची संख्या असणाऱ्या जुन्या-जाणत्या पशुपालकांच्या सोबत इंजिनिअर, शिक्षक, कृषी पदवीधर पशुपालकही सहभागी झाले आहेत. सुधारित तंत्राने पशुपालन आणि काटेकोर व्यवस्थापन या विषयाची चर्चा या गटामध्ये होते. इतर विषयांना यामध्ये थारा दिला जात नाही.

या पशुपालकांना एकत्र आणण्यामध्ये पशुतज्ज्ञ डॉ. दिनेश भोसले यांची महत्त्वाची भूमिका आहे. या गटाच्या वाटचालीबाबत डॉ. भोसले म्हणाले, ‘‘गायींची पैदास, व्यवस्थापन नियोजन आणि माहितीची देवाणघेवाण सोईची जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांचा विचार करून जिल्हानिहाय पाच क्लस्टर तयार करण्यात आले.

यामध्ये पहिला क्लस्टर सातारा, सांगली, कोल्हापूर, तर दुसरा क्लस्टर सोलापूर, तिसरा क्लस्टर पुणे, चौथा क्लस्टर नगर, नाशिक आणि पाचवा क्लस्टर मराठवाड्यातील पशुपालकांचा आहे. प्रत्येक क्लस्टरसाठी एक प्रयोगशील पशुपालक नियंत्रक म्हणून काम करतो. हे पशुपालक तसेच पशुतज्ज्ञ संबंधित विभागातील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देतात. सातत्याने सर्व जण तज्ज्ञांशी सल्लामसलत करतात.

गरजेनुसार पैदास धोरण आणि नोंदणीकृत वळूची निवड केली जाते. शिफारशीनुसार लसीकरण, गोठा स्वच्छता, दररोजच्या दुधाच्या नोंदी, जैव सुरक्षित मुक्त संचार गोठा आदी नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे लाळ्या खुरकूत, लम्पी तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव या पशुपालकांच्या गोठ्यात दिसत नाही.’’

‘‘पारंपरिक पद्धतीचे व्यवस्थापन असलेल्या गायी प्रत्येक वेतात केवळ ३,००० ते ४,००० लिटर दूध देतात. मात्र आता जातिवंत पैदास धोरणामुळे गटातील पशुपालकांना गेल्या तीन वर्षांत बाजारातून गाय खरेदी करण्याची वेळ आली नाही. शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या जातिवंत दुधाळ गाईंना आम्ही मुद्दामहून ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे.

गटामध्ये कालवडींची देवाण घेवाण होते. या पशुपालकांकडे हिरकणीची दुसरी पिढी दुधात आहे. गटातील पशुपालकांच्या माध्यमातून सध्या सहा हजारांहून अधिक एचएफ आणि २०० जर्सी गाईंचे शास्त्रशुद्ध संगोपन केले जाते. येत्या काळात एका वेतामध्ये (३०५ दिवस) सरासरी ८५०० ते १०,००० लिटर दूध देणारी एचएफ आणि सरासरी ५५०० ते ७५०० लिटर दूध देणारी जर्सी गाय पशुपालकाच्या गोठ्यात पाहायला मिळणार आहे. सरासरी ४ फॅट आणि एसएनएफ ८.६ चे सातत्य या गायींच्या दुधात असेल.’’

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT