Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Dairy Business : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा आधार आहे, असे मत संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : पुर्वीपासूनच शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाकाडे बघितले जात आहे. मात्र कालांतराने दुग्ध व्यवसायात स्पर्धा निर्माण झाल्याने युवकांनी सुद्धा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत नोकऱ्यांच्या मागे न लागता शास्त्रोक्त पद्धतीने, गोठे, चाऱ्याचे नियोजन करत दुग्ध व्यवसायात क्रांती निर्माण केली. दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा आधार आहे, असे मत संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कानिफनाथ व हरी ओम दूध शितकरण केंद्राचे उद्‍घाटन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. संघाचे उपाध्‍यक्ष राजेंद्र पाटील, बी. आर. चकोर, अॅड. ज्ञानेश्‍वर सांगळे, विलासराव कवडे, संतोष मांडेकर, विक्रमराजे थोरात, भारत मुंगसे, विष्णू ढोले, रवींद्र रोहम, संजय पोकळे, प्रमोद पावसे, गोरख नवले, अनिल घुगे, साहेबराव मंडलिक, रामचंद्रबाबा मंडलिक, साहेबराव गडाख, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

Milk Rate
Dairy Farm : न्यूझीलंडमधील निंबाळकर फार्म्स...

रणजितसिंह देशमुख म्हणाले, की कानिफनाथ शितकरण केंद्राचे सुमारे ५,५०० लिटर दुधाचे संकलन असून हरी ओम दूध शितकरण केंद्राचे ४,५०० लिटर दूध संकलन आहे. या दोन शितकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३५० दूध उत्पादक शेतकरी संघाशी जोडले गेले आहेत. या शितकरण केंद्राच्या माध्यमातूनही निमोण परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायातून आर्थिक उलाढाल होत आहे.

Milk Rate
Dairy Farming : कुटुंबाच्या एकजुटीतून दुग्धव्यवसायात समृद्धी

या दूध उत्पादकांचे फक्त दूधच घेतले जाणार नाही तर त्यांना इतर संस्थांप्रमाणेच सर्व सुविधा व संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. सहकारी संस्थांशी जोडल्यामुळे आपली भूमिका प्रभावीपणे मांडली जाऊ शकते. दूध उत्पादकांची काळजी संघाने घेतलेली आहे. संघाचे दूध संकलन गतवर्षीपेक्षा वाढलेले आहे.

संघाची उलाढाल ५५० कोटी झाली असून तालुक्यामध्ये त्यामुळे अर्थकारण बदलले आहे. तालुक्यातील व्यापारी क्षेत्र व बाजारपेठ ही संपूर्णपणे सहकारी संस्थावर अवलंबून आहे. संघाने दूध उत्पादकांसाठी विविध योजना सुरू केल्या. प्रत्येक घराघरात मुरघासाच्या बॅगा भरलेल्या दिसत आहेत. उत्पादकांसाठी पशुवैद्यकीय मेडिकल सुरू केले. स्मार्टकार्ड वाटप केले, त्याचा दूध उत्पादकांना फायदा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com