Animal Husbandry : पशुधन संगोपनासाठी कमी खर्चिक मुक्त संचार गोठा

Animal Care : मुक्त संचार पद्धतीत गोठा उभारणीसाठी बांधकामाच्या साहित्याची गरज ही न्यूनत्तम असते. त्यामुळे मुक्त संचार गोठा पद्धतीने कमी भांडवलात दुग्ध व्यवसायाची सुरुवात करणे शक्य होते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

डॉ. कल्याणी सरप, डॉ. विजयकुमार कोरे

Cattle Shed Management : मुक्त संचार पद्धतीत गोठा उभारणीसाठी बांधकामाच्या साहित्याची गरज ही न्यूनत्तम असते. त्यामुळे मुक्त संचार गोठा पद्धतीने कमी भांडवलात दुग्ध व्यवसायाची सुरुवात करणे शक्य होते. या उलट बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये गोठा उभारणीसाठी चार ते पाच पट अधिक भांडवलाची आवश्यकता असते. या पद्धतीत दूध काढण्या व्यतिरिक्त इतर सर्व वेळ जनावरे मोकळी ठेवता येतात.

जनावरांना मुक्त संचार करता येत असल्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण ही कमी होतो. या सर्व बाबी लक्षात घेता मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यास दुग्ध व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो.

Animal Husbandry
Animal Husbandry : विचाराल अचूक प्रश्न, तर होईल योग्य आजाराचे निदान

उभारणी

मुक्त संचार गोठ्यात दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी एक मोकळी जागा निवडून तिला चारही बाजूंनी बांबूची किंवा लोखंडाचे मजबूत कुंपण करावे लागते.

निवडलेल्या जागी पाण्याच्या निचऱ्याची समस्या असल्यास गोठ्याची तळाची भूमी दगडी व मुरूम टाकून भरून घ्यावी.

कुंपणाच्या एकाकडेला जनावरांसाठी शेड बांधावे. जेणेकरून ऊन पावसाच्या कालावधीत जनावरांना आडोसा मिळेल.

त्या शेडमध्ये खाद्य व पाण्याची व्यवस्था असावी.

Animal Husbandry
Animal Husbandry Policy : चवदार, मांसल कोंबड्यांसाठी ‘पशुसंवर्धन’ ठरविणार धोरण

फायदे

मुक्त संचार गोठ्यातील वातावरणामध्ये वासरांची वाढ झपाट्याने होते. तसेच उत्पादन क्षमता वाढीस मदत होते.

जनावरे मोकळी असल्यामुळे ती शेणावर व ओल्या जागेवर बसायचे टाळतात. त्यामुळे जनावरे बंदिस्त पद्धतीच्या तुलनेत अधिक स्वच्छ राहतात. त्यामुळे जनावरांना रोज धुण्याची आवश्यकता भासत नाही.

दररोज शेण उचलण्याची आवश्‍यकता भासत नाही.

जनावरे कायमस्वरूपी मोकळी असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये अमुलाग्र बदल घडतो. आवश्यकतेनुसार चारा व पाण्याचे सेवन करतात. त्यांच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होवून दूध उत्पादनात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होते.

या पद्धतीमध्ये जनावरांना मोकळे वातावरण उपलब्ध असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

जनावरे सहजासहजी आजारी पडत नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय खर्चामध्ये बचत होते.

माजावरील जनावरे लगेच ओळखून येतात. त्यामुळे योग्य वेळी रेतन करता येते.

जनावरे त्यांच्या मर्जीने गोठ्यातील चारा, पाणी आणि इतर गोष्टींचा उपभोग घेत असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो.

डॉ. कल्याणी सरप ९०९६८७०५५०

(विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com