Dragon Fruit Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit and Avocado Subsidy : एकात्मिक’मधून मिळणार ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडोला अनुदान

Horticulture Development Mission Scheme : सोलापूर जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून ड्रॅगनफ्रूट,ॲव्होकॅडोसारख्या फळबागांच्या लागवडीसह द्राक्षासाठी प्लॅस्टिक कव्हर, डाळिंबासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर या सारख्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०२३-२४ या योजनेसाठी जिल्ह्याला १४८६.३१ लाख रुपयांचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे. यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गास ८८.८७ लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गास रक्कम ६३.८७ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

...या घटकांसाठी अनुदान

ड्रॅगन फ्रूट, ॲवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके

फळबाग पुनरुज्जीवन

सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह

प्लॅस्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर

मधुमक्षिका वसाहत, मधुमक्षिका संच

ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत, पॉवर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त व कमी

पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस

पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर

प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीत साखळी, कांदाचाळ,

स्थायी व फिरते विक्री केंद्र- शितचेंबरच्या सुविधेस

...इथे करा अर्ज

‘‘या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे स्वत:ची शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असावीत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT