Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट अन् शेडनेटचा यशस्वी प्रयोग

Aslam Abdul Shanedivan

शेतकरी अडचणीत

मजुरांची वानवा, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यादरम्यान एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट घेत घवघवीत नफा मिळवला आहे.

Dragon Fruit Farming | Agrowon

यशस्वी शेतकरी

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील रामकुंड - वरकुटे खुर्द येथील आशिष प्रल्हाद शेंडे यांनी फळपीक शेतीत प्रयोग केला आहे. त्यांनी ३० एकर शेती फळबाग शेतीखाली आणली आहे.

Dragon Fruit Farming | Agrowon

ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

त्यांनी अठरा एकरांत पेरू, तीन एकरांत सीताफळ लागवड केली आहे. तसेच दुष्काळी स्थितीत अनुकूल ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला.

Dragon Fruit Farming | Agrowon

ड्रॅगन फ्रूटला मागणी आणि दर

ड्रॅगन फ्रूटला सर्वाधिक मुंबई, पुणे बाजारपेठेसह सोलापूरमध्येही मागणी. मदुराई, केरळमध्ये ही ड्रॅगन फ्रूट पाठवला. चालू वर्षी प्रति किलो ८० रुपयांपासून ते १४० ते कमाल १६० रुपयांपर्यंत दर मिळाले

Dragon Fruit Farming | Agrowon

शेडनेटचा प्रयोग

उन्हाची तीव्रता, पाण्याची कमतरता यामुळे फळांना सनबर्निंगचा मोठा धोका निर्माण होतो. त्यावर बागेवर ५० टक्के शेडनेटचा प्रयोग केला. तीन लाख खर्च करून साडेसहा फूट जागेत शेडनेट ठेवले.

Dragon Fruit Farming | Agrowon

व्यवस्थापनातील ठळक बाबी

१२ बाय सात फूट अंतरावर दीड ते दोन फूट खोल खड्डे काढून लागवड. आतून व बाहेरून लाल, आतून गुलाबी व बाहेरून लाल व जंबो रेड असे तीन वाण. एकरी ५०० खांब व दोन हजार रोपे.

Dragon Fruit Farming | Agrowon

१४ टनांपर्यंत उत्पादन

शेंडे यांनी फळपीक शेतीत प्रयोग करून २०२३ मध्ये ड्रॅगन फ्रूटचे एकरी १४ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. अधिक माहितीसाठी ही बातमी वाचा -https://agrowon.esakal.com/yashogatha/dragon-fruit-is-a-promising-alternative-in-drought-condition

Dragon Fruit Farming | Agrowon

Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?