Agriculture Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crops : पिकांना जगविण्यासाठी धडपड

Rain Update : परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. महागडे बी-बियाणे, खत वाया जाते काय? अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. महागडे बी-बियाणे, खत वाया जाते काय? अशी भीती शेतकऱ्यांना आहे. आता पावसाची प्रतीक्षा संपली असून बळिराजाची विहिरीच्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी धडपड सुरू आहे.

गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरिपातील पिके वाया गेली होती. कपाशी, सोयाबीन, तूर पिके प्रारंभीच्या पावसावर बऱ्यापैकी अंकुरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या. चांगले उत्पन्न पदरी पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, पावसाने दगा दिला. अत्यल्प पावसामुळे कपाशीसह इतर पिकांचे उत्पन्न घटले. कपाशीला सात हजार रुपयांवर मिळू शकला नाही. फक्त तुरीला सात ते आठ हजार रुपयांचा दर मिळाला होता.

यंदा, मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला. सलग दोन दिवस धोधो पाऊस झाला. त्यामुळे, शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवडी केल्या. शिवराई, वाळूज, केसापुरी, परदेसवाडी, नायगाव, रामराई नारायणपूर, लांझी, जोगेश्वरी, वळदगाव, पाटोदा, पिंपरखेड शेतशिवार खरीप पिकांनी व्यापून गेले. अधूनमधून रिमझिम पडणाऱ्या पावसाने पिके डोलू लागली होती. मात्र, परिसरातून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले. पावसाअभावी पिके माना टाकत आहेत.

विहिरीच्या पाण्याने पिकांवर रोग

पाऊस नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांची खरीप पिके जगविण्यासाठी धडपड सुरू आहे. कपाशी, तूर पिकांना पाणी देणे सुरू केले. पावसाच्या पाण्यामुळे पिकांची वाढ योग्यरितीने होते. पावसाच्या थेंबांमुळे पिके धुवून निघतात. यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. मात्र, विहिरीच्या पाण्यामुळे पिकांचा वाढ खुंटते. किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जातो. त्यावर फवारणी करणे अनिवार्य होऊन खर्च वाढतो.

वारंवार विद्युत पुरवठा खंडित

पिकांना पाणी देताना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही होत आहे. एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे महावितरणच्या सावळ्या गोंधळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक

Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य

India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना

Potato Farming Losses: खर्च ५८ हजार अन् उत्पन्न अवघे २७ हजार

River Conservation: नदीचे आक्रंदन जाणणाऱ्या शैलजा

SCROLL FOR NEXT