Palghar News : बारपेठांमध्ये सध्या परराज्यातील पणत्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. स्थानिक स्तरावरही काही प्रमाणात उत्पादन होत असले, तरी राज्यातील माती पणत्या तयार करण्यास फारशी योग्य नसल्याने त्यांना तडा जाण्याची शक्यता वाढते. दिव्यांचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा उजळल्या आहेत..घराघरात रोषणाईसाठी लागणाऱ्या मातीच्या, मेणाच्या आणि इलेक्ट्रॉनिक पणत्यांची खरेदी सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात आधुनिक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली असली तरी पारंपरिक मातीच्या पणत्यांशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत नाही. .Agriculture Irrigation: सिंचनात कायद्याचे राज्य येईल?.पालघर जिल्ह्यातील विविध बाजा. त्यामुळे स्थानिक कुंभारांना गुजरात, बिहार आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांतील मातीवर अवलंबून राहावे लागत आहे. उत्पादन खर्च, मजुरी आणि मेहनत अधिक तर मिळकत कमी असल्याने अनेक स्थानिक कारागीर आता थेट तयार माल घाऊक बाजारातून घेऊन किरकोळ विक्री करण्यावर भर देताना दिसत आहेत..त्यामुळे परराज्यातील पणत्या जिल्ह्यातील बाजारपेठांवर वर्चस्व गाजवत आहेत. दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये रंगत आली असून, आकर्षक सजावट आणि प्रकाशमय दुकाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे या वर्षीचा दिवाळी बाजार उत्साहात उजळला आहे. .Agricultural Exports: द्राक्ष-मनुका-डाळिंब निर्यातीचे ‘सांगली पॅटर्न’ मॉडेल बनविणार.बाजारात २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध असून, त्यामध्ये साध्या, नक्षीकाम असलेल्या, रंगीत, नारळातील, पानातील, पंचमुखी आणि मोठ्या आकाराच्या पणत्यांचा समावेश आहे..रस्त्यालगत साहित्य विक्रीगेल्या काही दिवसांत डहाणू तालुक्यात गुजरातमधील सुमारे आठ ते दहा विक्रेते दाखल झाले असून त्यांनी बाजारपेठांमध्ये रस्त्यालगत दुकाने उघडली आहेत. विक्रेते रोशन सहा यांनी सांगितले की, आम्ही गेल्या आठ दिवसांपासून डहाणू येथे पणत्या आणि दिवाळी साहित्य विक्री करत आहोत. स्थानिक ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.