Jalgaon News : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. केवायसीअभावीची प्रक्रिया पूर्ण करा व अनुदानाचा लाभ घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपोटी प्राप्त झालेली २९९ कोटी रुपये नुकसान भरपाई केवायसीअभावी शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. सुमारे २४ हजारांवर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासन हे अनुदान संबंधित लाभार्थींना देऊ शकत नाही.
केवायसीची प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण करावी, असे आवाहन जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे. ई केवायसी न केल्यास लाभाची रक्कम किंवा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याची स्थिती आहे. या कामासाठी संबंधित तालुका कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही २०२२ मध्ये काही भागांत अतिवृष्टी किंवा अधिक पाऊस झाला होता. त्यात घरगोठ्यांसह शेतीची हानी झाली होती. या भागातही सुमारे अडीच हजारांवर शेतकऱ्यांना केवायसीअभावी नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकलेली नसल्याची माहिती मिळाली.
मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२ मध्ये मोठी हानी झाली. दोन लाख ६३ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यात चाळीसगाव, मुक्ताईनगर व पारोळा तालुक्यांत अधिकची हानी झाली. या हानीसंबंधी प्रशासनाने पंचनामे केले व भरपाईसाठी अहवाल पाठविला होता. यासंबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमही शासनाने दिली. परंतु ही रक्कम किंवा निधी पडून आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.