Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Crop Damage: जोरदार वाऱ्यामुळे केळी,आंबा फळपिकांचे नुकसान

Storm Damage Update: परभणी जिल्ह्यात सोमवारी (५ मे) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, आंबा, संत्रा व मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारी (ता.५) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. बहुतांश भागात जोरदार वारे वाहिले. केळीची झाडे मोडून पडली.

आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. संत्रा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावला. शेडनेटगृह, सौर कृषिपंपाचे पॅनेलचे नुकसान झाले. घरे, गोठ्यावरील पत्रे उडून गेली. तारा तुटल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला.

परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारी (ता.५) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक होता. जोरदार वाऱ्यामुळे पेडगाव, सिंगणापूर, सजपूरजवळा (ता.परभणी), कान्हेगाव (ता.पूर्णा) आदी गावांतील निसवलेल्या केळी बागा तसेच संत्रा आदी फळांचे अतोनात नुकसान झाले.

परिपक्व झालेले आंबे गळून पडले आहेत. जिंतूर तालुक्यातील अनेक भागांत वाऱ्यासह पाऊस झाला. मानवत तालुक्यातील मानवत, रुढी, खरबा, कोल्हा, उकलगाव, कोथाळा, सावंगीवाडी आदी गावांतील आंबा, संत्री, मोसंबीची झाडे मोडून पडली. शेडनेटगृहाची हानी झाली. हळद काढणीची कामे सुरू आहेत. शिजवलेली हळद शेतामध्ये वाळवत घातली आहे. पावसात भिजून होणारे नुकसान टाळण्यासाठी हळद झाकून ठेवताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

सजपूर जवळा येथील रामभाऊ इंगळे म्हणाले, की आमच्या गावात यंदा मोठ्या प्रमाणावर केळी लागवड झाली होती. सोमवारी (ता.५) सायंकाळी जोराच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे घडासकट मोडून पडली आहेत. माझी एक एकर केळीची बाग मोडून पडली आहे. कारेगाव येथील समर्थ व कृष्णा आवचार म्हणाले, की आमच्या पाच एकरांतील जवळपास पन्नास टक्के केसर आंबे वादळामुळे गळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT