Shaktipith Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्गाला गावागावातून तीव्र विरोध, शेतकऱ्यांचे उपोषण

Shaktipith Mahamarg : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून शक्तिपीठ महामार्गविरोधी शेतकरी बचाव कृती समितीने उपोषण केले.

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipith Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी याला विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. दरम्यान आता शक्तिपीठ महामार्गाला गावागावातून विरोध होताना दिसत आहे.

शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तिपीठ महामार्गविरोधी शेतकरी बचाव कृती समितीने काल(ता.१३) एकदिवसीय उपोषण केले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ दिला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

समितीचे अध्यक्ष संजय परमाप्पा म्हणाले, 'महामार्गासाठी गावात पाऊल ठेवल्यास संघर्ष अटळ आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन किंवा अल्पभूधारक होणार आहेत त्याच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. महामार्ग करण्यासाठी शासनाने जबरदस्ती केल्यास तितक्याच ताकदीने विरोध करणार असल्याचा इशारा देण्यात आला.'

'शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य न करता शक्तिपीठ महामार्गाला विरोध असताना शासन महामार्ग करत आहे. या महामार्गामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शिरोळ तालुक्यातील दानोळीसारख्या गावात अत्यंत कसदार जमीनी जाणार आहेत. याचबरोबर यासह अन्य गावातील कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. परंतु आवश्यक नसताना महामार्ग निर्माण केला जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून तो आम्ही सहन करणार नाही असा एल्गार गावकऱ्यांनी पुकारला.'

यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करा यासह अनेक घोषणा दिल्या. गावापासून अवघ्या ४ किमीवर राष्ट्रीय महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट का, असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केला. शक्तिपीठ महामार्ग बंद पाडण्यासाठी दानोळी परिसरातील शेतकरी एकवटला आहे. महामार्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील व माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सावकर मादनाईक यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. खासदार धैर्यशील माने यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी तलाठी महेश नागरगोजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. अध्यक्ष संजय परमाप्पा, उपाध्यक्ष अशोक आनंदा, धनपाल परमाप्पा, आशुतोष पाटील, किरण बिनीवाले, चौगोंडा पाटील, देवगोंडा कटारे, कुबेर सांगले, जयकुमार पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-UK Trade Deal: भारत-इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही

Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

Turmeric Price: हळदीचे दर दबावात

Pomegranate Crop Loss: डाळिंब बागायतदारांवर कोसळले अस्मानी संकट

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT