Rose Farming : लग्नसराईचा हंगाम साधण्यासाठी तयारी सुरू

Rose Cultivation : मळवंडी ठुले येथील संतोष ठुले यांच्याकडे पाच एकर शेती असून, त्यापैकी ३० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस आहे. त्यामध्ये डच गुलाबाची लागवड आहे.
Rose Farming
Rose FarmingAgrowon

Rose Farming Management : शेतकरी नियोजन

पीक : गुलाब

शेतकरी : संतोष मारुती ठुले

गाव मळवंडी ठुले, ता. मावळ, जि. पुणे

एकूण शेती : ५ एकर

पॉलिहाउसमध्ये गुलाब : ३० गुंठे

व्हॅलेंटाइन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मावळमधील गुलाब उत्पादक शेतकरी हे लग्नसराईच्या हंगामात फुले विक्रीला‌ आणण्याच्या दृष्टीने तयारी करत असतात.

मळवंडी ठुले येथील संतोष ठुले यांच्याकडे पाच एकर शेती असून, त्यापैकी ३० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस आहे. त्यामध्ये डच गुलाबाची लागवड आहे. दरवर्षी या गुलाब शेतीतून खर्च वजा जाता १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते.

व्हॅलेंटाइन आणि लग्न समारंभामध्ये प्रामुख्याने लाल रंगाच्या फुलांना जास्त मागणी असते. संतोष यांनी त्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार विविध कामांना सुरुवात केली आहे.

Rose Farming
Rose Farming Techniques : आव्हाने पेलून दिला आयुष्याला ‘गुलाबी अर्थ’

पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे...

या वर्षी पाण्याची कमतरता जाणवण्याची अधिक शक्यता दिसत असल्याने आधीपासूनच त्या दृष्टीने नियोजन केले आहे. उर्वरित शेतीमध्ये कमी पाणी लागणारी कडधान्ये घेतली होती. त्यामुळे गुलाबाचे तीस गुंठे, टोमॅटोचे पाऊण एकर क्षेत्र यासाठी पाणी पुरवून वापरले जाणार आहे. त्यासाठी पॉलाहाउसमध्ये ठिबक आणि मिस्टिंगची प्रणाली बसवलेली आहे.

त्यामुळे गुलाबाच्या मुळांना पाणी पुरविण्यासोबत पिकांच्या कॅनॉपीमध्ये आणि मुळांच्या नजील आवश्यक तो ओलावा निर्माण करून सूक्ष्म वातावरण टिकवले जाते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला फायदा होतो. उन्हाळा आता कडक होत चालला आहे. ठिबकमुळे लॅटरलच्या परिसरामध्ये ओलावा राहतो.

मात्र गादी वाफ्याच्या कडा कोरड्या राहून तापमान वाढते. अशा वेळी पाइपच्या साह्याने त्या भिजवून घेतल्या जातात. यामुळे पॉलिहाउसमधील तापमान कमी होऊन आवश्यक आर्द्रता स्थिर राहते. दर काही टप्प्यानंतर मिस्टिंग करूनही कॅनॉपीतील आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवली जाते. उन्हाळा वाढत जाईल, तसे प्रति अर्ध्या तासाला मिस्टिंग सुरू केली जाईल. अर्थात, या सर्वांसाठी पाणी आवश्यक असते. ते आतापासून जपून वापरले जात आहे.

मागील पंधरा दिवसांतील कामकाज

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादक‌ शेतकरी मावळ तालुक्यात असून, सामान्यतः नाताळ आणि व्हॅलेंटाइन डेच्या (१४ फेब्रुवारी) दृष्टीने सर्व जण नियोजन करत असतात. या काळात फुलांची मागणी अधिक असून, दरही चांगला मिळून जातो. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात काढणी झाल्याने झाडांवर कट बसलेले असतात.

१५ एप्रिल - मे या काळातील लग्नसराईचा हंगाम गाठण्यासाठी १० मार्च ते ३१ मार्च या २१ दिवसांच्या कालावधीतील कामांचे नियोजन केले आहे. त्यानुसास फुलदांड्यांच्या जोमदार वाढीसाठी योग्य खतांचे नियोजन केले जात आहे. तणे काढणे, माती गलवून मोकळी करणे इ. कामे करून घेतली आहेत.

पानांची संख्या योग्य राखण्यासाठी काही फुटवे बेंड केले जातात.

वाळलेल्या फांद्या कट करणे, पिवळा पाला काढून टाकणे या सह स्वच्छतेची कामे ५ मार्चपर्यंत पूर्ण केलेली आहेत.

सध्या लग्न समारंभाच्या हंगामासाठी गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे.

पॉलिहाउसमधील तापमान कमी ठेवण्यासाठी प्लॅस्टिक पेपरवर पांढरा वॉशेबल डिस्टेम्पर फवारला जातो. त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाह्य वातावरणाच्या तुलनेत आतील तापमान कमी राहते. सरळ पडणाऱ्या तीव्र उन्हापासून झाडांचे संरक्षण होते.

Rose Farming
Rose Flower Farming :यशस्वी गुलाब शेतीतून मिळवली समृद्धी

पुढील पंधरा दिवसाचे नियोजन

येत्या काळात आवश्यकतेनुसार कटिंग, बेंडिंग, क्लिपिंग या कामांवर भर दिला जाणार आहे.

ऊन वाढल्याने ठिबकद्वारे पाणी देण्याचे प्रमाण वाढवले जाईल.

बेडच्या बाजू व कडेला ओलावा‌ ठेवण्यासाठी एक किंवा दोन दिवसाआड होजिंग (पाइपने पाणी मारण्याचे काम) केले जाईल.

दर फुलांचा आकार मोठा राहण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जाईल. आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांच्या फवारणी घेतल्या जातील.

महत्त्वाचे...

देशांमध्ये गुवाहाटी, नागालँड, कोलकाता, जम्मू, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, पणजी, बंगलोर, हैदरावाद, पटना, इंदूर, छत्तीसगड, अमरावती (आंध्र प्रदेश) या अन्य राज्यांसोबत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या बाजारपेठेमध्ये दरानुसार फुले पाठवली जातात.

सध्या २० फुलांच्या एका गुलाब गड्डीचा दर १२० ते १३० रुपयांदरम्यान आहे. म्हणजेच प्रति फूल ६ ते ७ रुपये दर मिळत आहे.

यंदा व्हॅलेंटाइनमध्ये ‌केवळ ३० टक्के फुलांचीच निर्यात झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात फुलांची आवक जास्त आल्याने अपेक्षित दर मिळाले नाहीत. आता आम्हा शेतकऱ्यांची संपूर्ण मदार ही लग्नसराईवर आहे.

संतोष मारुती ठुले, ९७६४८४०५६९

(शब्दांकन : संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com