Social Media Marketing agrowon
ॲग्रो विशेष

Social Media Marketing : हिरव्या चाऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, चारा विकण्याचा नवा फंडा

Maize Crop : मका पिकाला आता हिरवा चारा म्हणून पसंती अधिक मिळत असल्याने खेड्यापाड्यातील शेतकरी मका विकणे आहे, असे मार्केटिंग सोशल मीडियावर करत आहेत.

sandeep Shirguppe

Green Fodder Social Media : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यानंतर चाऱ्यासाठी उसाचे वाडेही गायब झाले आहे. यामुळे मार्चपासून जनावरांना हिरव्या चाऱ्याची आस लागली आहे. त्यासाठी पशुपालक अशा चाऱ्याच्या शोधात आहेत. मका पिकाला आता हिरवा चारा म्हणून पसंती अधिक मिळत असल्याने खेड्यापाड्यातील शेतकरी मका विकणे आहे, असे मार्केटिंग सोशल मीडियावर करत आहेत. त्याचा पशुपालकांना फायदा होत आहे.

अलीकडील काही वर्षांपासून दुग्ध व्यवसायाचा आलेख उंचावला आहे. अगदी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजूरही या व्यवसायातून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाळा आणि ऊसतोड हंगामात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत नाही; परंतु फेब्रुवारी-मार्चपासून हा चारा उपलब्ध करणे पशुपालकांसमोर आव्हान मानले जात आहे. यंदा ऊसतोड हंगाम लवकर संपला आहे.

यामुळे दरवर्षी एप्रिलमध्ये जाणवणाऱ्या हिरव्या चाऱ्याची टंचाई यंदा मात्र मार्चपासूनच जाणवू लागली आहे. परिणामी, हिरव्या चाऱ्याअभावी दूध उत्पादनातही घट होत असल्याचे पशुपालक सांगत आहेत. पावसाळ्याची बेगमी म्हणून वाळलेल्या चाऱ्याची गंजी रचण्यात पशुपालकांची धावपळ उडाली आहे.

हिरवा चारा नसल्याने या गंजीतीलच सुका चारा टाकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. उसात भांगलणी सुरू असल्या तरी उसाचा पाला काढण्यात येत नाही. पावसाळ्यातच हा पाला काढून त्याचा वापर चाऱ्यासाठी केला जातो; परंतु आता एप्रिल व मे हे दोन महिने हिरव्या चाऱ्याअभावी कसे काढायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.

यामुळे काही शेतकऱ्यांनी उसात किंवा स्वतंत्रपणे चारावर्गीय असलेल्या मक्याचे उत्पादन घेत आहेत. ऐन हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमध्ये पशुपालकांना हा चारा उपयुक्त ठरत आहे. प्रत्येक गावात आता व्हॉटस् अॅप ग्रुप कार्यरत आहेत. चारावर्गीय मका विकण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मका विकणे आहे, असा संदेश पडत असल्याने पशुपालकांना सोयीचे ठरत आहे. पर्यायी चारा म्हणून मक्याला पसंती दिली जात असून मागणीही वाढली आहे.

असे आहेत दर

शेतातच उभ्या असलेल्या पिकाचा फोटो टाकून मका विकणे आहे, असे संदेश फिरत असले तरी दर मात्र अधिक आहेत. सरी किंवा गुंठ्यावर हा मका विकला जात आहे. मध्यम लांबीच्या एका सरीला तीनशे ते साडेतीनशे, तर दहा गुंठ्यांतील मक्यासाठी सात ते आठ हजारांचा दर आहे.

विशेष म्हणजे खुद्द पशुपालकाने हा चारा कापून न्यायचा असतो. मिळणाऱ्या दूध दराचा आणि चाऱ्याच्या दरात तफावत असल्याने परवडत नसले तरी जनावरांना हिरवा चारा मिळावा म्हणून पशुपालक हा तोटा सहन करत आहेत. मोठा गोठा असणाऱ्या पशुपालकांकडून मक्याला अधिक मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Aid: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT