Kolhapur Fruit Market : टोमॅटो, वांगी, मिरची, गवारीचे दर घसरले, द्राक्ष आंब्याची बाजारात रेलचेल

Vegetable market : उन्हाच्या झळा वाढतील तसे भाजीपाला बाजारात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर कमालीचे कमी झाले आहेत.
Kolhapur Fruit Market
Kolhapur Fruit Marketagrowon

Tomato Price : उन्हाच्या झळा वाढतील तसे भाजीपाला बाजारात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर कमालीचे कमी झाले आहेत. या आठवड्यात भाव वाढण्याची शक्यता असताना प्रत्यक्षात चांगली आवक बाजारात झाली आहे. यंदा दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतीला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊन दर वाढण्याची शक्यता होती. परंतु बाजारात दर कमी झाल्याचे चित्र आहे.

टोमॅटो, वांगी, मिरची, गवारीचे दर चांगलेच घसरले आहेत. दुसरीकडे भाज्यांचे वाढते दर जागीच थांबले असून मोठ्या प्रमाणात आवकेत भर पडली आहे. सध्या बाजारात आवक जादा होत असली तरी मागणी फारच कमी आहे.

फळ बाजारात मालाचा तुटवडा जाणवत आहे. चिकू, आंबा, टरबूज, कलिंगड आदी फळांची आवक चांगली आहे. अन्य फळांची सुरळीत आवक होण्यास पुढील महिना उजाडेल, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले. शेवटचा भार असलेल्या द्राक्षांचे दर काहीसे वाढले आहेत.

आंब्याच्या नवनवीन प्रजाती दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या किलोवर विक्री होणाऱ्या केशर हापूस आंब्याला पसंती वाढत आहे. शिमगा होताच फूल बाजाराचा हंगाम सुरू झाला आहे. निशिगंधाचे भाव दुप्पट झाले असून, अन्य फुलांचे भाव स्थिर आहेत.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला :

टोमॅटो १० ते १५, दोडका-५० ते ६०, वांगी ३० ते ५०, कारली ४० ते ५०, ढोबळी मिरची ६० ते ८०, मिरची - ८० ते ९०, फ्लॉवर ३० ते ४०, कोबी - १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १२० ते १५०, आले- १०० ते १२०, लिंबू ३०० ते ७०० शेकडा, गाजर- ३० ते ४०, बीन्स ७० ते ८०, गवार -८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी - ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०, पालेभाज्या पेंढी १५ ते २०, शेवगा - ३ रुपये.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध -३००, गुलाब - १८० ते २००, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १५०.

फळे : सफरचंद २५० ते ४००, संत्री- १२० ते १३०, मोसंबी ५० ते ८०, डाळिंब- १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू-५० ते ८०, खजूर-१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ ८० ते १००, कलिंगड ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी ५० ते ६० डझन, देशी केळी ७० ते ८० डझन, किवी १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, बोरे - ५० ते ६०, अंजीर -८०-१००. खाद्यतेल : सरकी - ११५ ते १२०, शेंगतेल - १७६ ते १८२, सोयाबीन ११६ ते १२०, पामतेल - ११० ते ११६, सूर्यफूल - १२० ते १२५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी ३१ ते ३७, बार्शी शाळू - ३२ ते ५५, गहू ३२ ते ४०, हरभराडाळ - ७३ ते ७६, तूरडाळ- १४० ते १५०, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ ७८ ते ८२, उडीदडाळ- १२२ ते १३०, हरभरा - ७०, मूग - १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोला-१४० ते १६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com