Parbhani News: शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. परंतु चालू कर्ज माफ करण्यास सरकार तयार नाही. चालू कर्जदार शेतकऱ्यांवर जास्त संकटे असल्यामुळे ते अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीत येत नसेल तर आंदोलन पेटवावं लागेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला..जिंतूर (जि. परभणी) येथे मंगळवारी (ता. ३०) आयोजित शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग हक्क परिषदेत श्री. कडू बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर उद्घाटक होते, तर शेतकरी नेते लक्ष्मण वडले अध्यक्षस्थानी होते..Farmer Loan Waiver: थकित, नियमित कर्जदारांची शासनाने मागवली माहिती .दीपक केदार, प्रशांत डिक्कर, माधुरी क्षीरसागर, ईर्शाद पाशा, अमृत शिंदे, माणिक कदम, शिवलिंग बोंधने, विश्वंभर गोरवे, बाळासाहेब आळणे, लिंबाजी कचरे, हनुमान आमले, हेमचंद्र शिंदे, सचिन राठोड, प्रसाद गोरे, ओंकार पवार, दगडूबा वजीर उपस्थित होते..श्री. कडू म्हणाले, ‘‘कापूस, सोयाबीन, केळी इतरही शेतीमालाला योग्य भाव नाही. जंगली जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. काय पेरावे हेच समजत नाही. चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. या स्थितीत आंदोलन पेटवून ठेवणे जिकिरीचे झाले. भाजप सरकारकडून पैशाच्या जोरावर हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत.’’.Bacchu Kadu: कर्जमाफीच्या शब्दापासून फिरल्यास गाठ आमच्याशी आहे.श्री. जानकर म्हणाले, ‘‘सोन्याचे दर वाढत आहेत. परंतु कापूस, सोयाबीनचे दर वाढत नाहीत. कर्जमाफी केली नाहीतर आंदोलन केले जाईल.’’ श्री. वडले म्हणाले, ‘‘शेतीमालाची कमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे..त्याबाबत नेत्यांना प्रश्न विचारावे लागतील. ’’ या वेळी, येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा, करपरा, दुधना या नद्यांसह ओढ्या नाल्यांचे सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण करण्यात यावे, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, महिला बचत गट व मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावीत आदी मागण्यादेखील परिषदेत करण्यात आल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.