Sugar Mill  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Loan : ‘एनसीडीसी’च्या कर्जासाठी वैयक्तिक हमीपत्र बंधनकारक

NCDC Sugar Mill Loan : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी कर्ज दिले जाते.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी कर्ज दिले जाते. सहकार विभागाने आणलेल्या कर्जवाटपाच्या नव्या धोरणात आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाकडून या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या कर्जाची व्याजासह विहित मुदतीमध्ये परतफेड करण्यासाठी वैयक्तीक व सामूहिक हमी घेतली जाणार आहे. संचालकांची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारीबाबतचे हमीपत्र आणि तसा संचालक मंडळाचा ठराव सादर करणे बंधनकारक केले आहे.

दर महिन्याच्या ०५ तारखेस संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने कर्जाची परतफेड होईपर्यंत साखर आयुक्तालयास अहवाल सादर करावा लागणार आहे. कारखान्याचे हमीपत्र, कारखान्याच्या अधिकृत सॉलिसिटर यांच्याकडून तपशिल प्राप्त झालेल्या अचल मालमत्तेचे गहाणखत करून कारखान्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर या कर्जाच्या बोजाची नोंद घेतली जाणार आहे.

गहाणखतावर कारखान्याने कॉमन सील लावून गहाणखतासह इतर दस्ताऐवजावर सह्या करण्याचे अधिकार दिल्याचा कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठराव सादर करावा. कर्जाची थकबाकी निर्माण झाल्यास एक महिन्याच्या आत संबंधित सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी शासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार आहे.

अर्थसहाय्याची परतफेड, विनियोग, शासन निर्णयातील इतर अर्टीच्या पालनाचा मासिक अहवाल संयुक्त स्वाक्षरीने देण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.

अशी असणार पूर्व हंगामी खर्चाची मर्यादा

प्रतिदिन २ हजार ५०० मेट्रीक टनापर्यंत असलेल्या कारखान्यासाठी ४२ कोट, प्रतिदिन २ हजार ५०० ते ५ हजारांपर्यंत क्षमता असलेल्या कारखान्यांसाठी ९० कोटी, प्रतिदिन ५ हजार ते ७ हजार ५०० पर्यंत क्षमता असलेल्या कारखान्यांनीसाठी १३१ कोटी, प्रतिदिन ७ हजार ५०० ते १० हजारांपर्यंत क्षमता असलेल्या कारखान्यांसाठी १७० कोटी, प्रतिदिन १० हजार ते १५ हजारांपर्यंत गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांसाठी १७३ कोटी रुपये, प्रतिदिन १५ हजारांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी २६६ कोटी रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा निश्‍चित केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT