Grape Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Vineyard Management : द्राक्ष शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे

Grape Farming : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव यांनी द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या विविध किडी व त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल बोलताना भीतीपोटी बागायतदार मोठ्या प्रमाणावर फवारण्या घेतात.

गणेश कोरे

Pune News : ‘‘शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर त्यांची योग्य अंमलबजावणी केल्यास चांगले उत्पादन मिळते,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुजय सहा यांनी केले.

तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे आयोजित द्राक्ष शिवार फेरी व कीड रोग व्यवस्थापन चर्चासत्रप्रसंगी सहा बोलत होते. यावेळी द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या केवडा (डाउनी), भुरी (पावडरी) व करपा रोग व्यवस्थापनाबद्दल त्यांनी उपस्थित बागायतदारांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव यांनी द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या विविध किडी व त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल बोलताना भीतीपोटी बागायतदार मोठ्या प्रमाणावर फवारण्या घेतात.

परंतु असे न करता आपल्या बागेतील निरीक्षणांनुसार फवारणी घेण्याचे आवाहन केले. तर, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

या वेळी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी शिवार फेरीबाबत द्राक्ष बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी शिवाजी तरंगे, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, साहेबराव मदने, उमेश घोगरे, चंद्रकांत माळी, मनोज मोरे, शिवाजी करे, पिनू मोरे, अतुल मोरे, विजय जगताप, संपत बुटे, माऊली शिंदे, विष्णू हरणावळ, अशोक टकले, मामासाहेब डोंबाळे, हनुमंत तरंगे, अविनाश तरंगे, समाधान तरंगे, बापूराव मदने यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT