Grape Management : द्राक्ष बागेत पानगळ, फळछाटणी करताना घ्यावयाची काळजी

Grape Prunning : द्राक्षाची फळ छाटणी हे कुशलतेचे काम आहे. त्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवावा. यासाठी प्रत्यक्ष छाटणी घेताना खालील मुद्द्यांचा विचार आवश्यक आहे.
Grape Management
Grape ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. स. द. रामटेके, अप्पासो गवळी

Grape crop : द्राक्षाची फळ छाटणी हे कुशलतेचे काम आहे. त्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवावा. यासाठी प्रत्यक्ष छाटणी घेताना खालील मुद्द्यांचा विचार आवश्यक आहे.


१) छाटणीपूर्वी केलेल्या काडी तपासणीच्या निष्कर्षानुसार छाटणीसाठी काही ठोकताळे बांधावेत. यामध्ये सबकेन जोडानंतर राखावयाच्या डोळ्यांच्या, तसेच सरळ काडीवरील ठरावीक आखूड पेरांचा विचार करावा लागतो. काडी तपासणी शक्य झाले नसल्यासही छाटणी करताना असे ठोकताळे उपयोगी पडतात.

परदेशामध्ये (युरोप, ऑस्ट्रेलिया) फळधारकता पडताळणीच्या निष्कर्षाचा उपयोग संभाव्य उत्पादनाचा अंदाज घेणे व भविष्यातील नियोजनासाठी केला जातो. (मुख्यतः वायनरी उद्योग) तसेच यंत्राद्वारे छाटणी करताना छाटणीच्या मर्यादा ठरविण्यासाठीही अशी तपासणी उपयोगी पडते.

२) सबकेनच्या जोडाच्या ठिकाणावरील डोळा हा बहुतेक वेळा फळधारक असतो. या ठिकाणी घड चांगल्या प्रतीचा असतो. यालाच ‘टायगर बड’ असे म्हटले जाते. हा डोळा राखून छाटणी करणे योग्य ठरते.
३) सरळ काडीवरील सहा ते दहा डोळ्यांमध्ये आखूड असलेले पेर राखून पुढे छाटणी करणे योग्य ठरते. कारण आखूड पेरांवर डोळे फळधारक असण्याची शक्यता जास्त असते.


४) जाड काड्यांवरील फळधारक डोळ्यांमधील अंतर अधिक असते, याचा छाटणी घेताना विचार करावा.
५) पहिल्या वर्षीच्या द्राक्ष बागेसाठी फळछाटणी घेताना शक्यतो अनुकूल वातावरण पाहून छाटणी घ्यावी. नवीन बागेतील काडीमध्ये अन्नसाठ्याची उपलब्धता कमी असू शकते. अशा स्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये द्राक्षाची फळछाटणी घेतल्यास बागेत फळधारक डोळे कमी निघण्याची शक्यता असते.

Grape Management
Grape Crop Management : सांगलीत द्राक्ष फळछाटणी सुरू

पानगळ करण्याच्या पद्धती : १) हाताने पाने काढणे : मजुरांकडून पाने काढून आपण वेलीची पानगळ करता येते. मात्र त्यासाठी अधिक मजूर लागत असल्याने ती खर्चिक व वेळखाऊ ठरू शकते. सध्या मजुरांच्या उपलब्धता कमी असल्याने बहुतांश बागायतदार ही पद्धत वापरत नाहीत.

हाताने पानगळ केल्यानंतर काडी १० ते १२ दिवस उघडी राहिल्यास, पानातील अन्नद्रव्ये काडीवरील डोळ्यात गोळा होतात. त्यानंतर डोळे फुगण्यास सुरुवात होते. डोळे एकसारखे फुगल्यास फळछाटणीनंतर एकसारखी फूट निघण्यास मदत होते.

२) रसायनाद्वारे पानगळ करणे : इथेफॉन (३९ टक्के एसएल) हे फॉस्फोनेट कुटुंबातील पद्धतशीर वनस्पती वाढ नियंत्रक असून, त्याचा वापर द्राक्षामध्ये पानगळ करण्यासाठी, मण्यांना रंग येण्यासाठी केला जातो. ते वनस्पतींच्या उतींमध्ये प्रवेश करून, स्थलांतरित होते. हळूहळू इथिलीनमध्ये विघटित होत असल्यामुळे वाढीच्या प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करते.

इथिलीन हे अंतर्गत इथिलीनच्या उत्पादनास उत्तेजन देत असल्याने अनेक शारीरिक प्रक्रियांवर थेट प्रभाव टाकते. (विशेषतः पिकणे, परिपक्वता इ.). फळांची गोडी छाटणी करते वेळेस काडीवरील पाने इथेफॉन या संजीवकांच्या वापराद्वारे काढली जातात. ऑक्टोबर छाटणीपूर्वी सुमारे दोन आठवडे आधी इथेफॉन ७ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. मात्र साधारणपणे छाटणी करताना पावसाळी वातावरण असते.

Grape Management
Grape Management : फुलोरा, सेटिंग अवस्थेत घ्यावयाची काळजी

अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार नवीन फुटीची वाढ रोखण्यास पोटॅशची मात्रा जास्त प्रमाणात देतात. परंतु पोटॅशमुळे देठाला मजबुती येते. त्यामुळे इथेफॉनच्या कमी मात्रेमुळे पानगळ होत नाही. सध्याच्या वातावरणाचा विचार करता इथेफॉनसोबत अन्य रसायने मिसळू नयेत.

द्राक्ष बागेतील पानगळ साधारणतः ७० ते ८० टक्के झाली असल्यास बागेची छाटणी करून घ्यावी. पानगळ केल्यामुळे काडीवरील डोळ्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे डोळे क्रियाशील होतात. पर्यायाने फुटी लवकर निघण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे वेलीवर घड मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पानांचे पूर्ण विघटन होण्यासाठी पानापासून ते कळ्यापर्यंत अन्नद्रव्ये गोळा करण्यास मदत करते.

इथिलीनची वाढ आणि वेलीमधील ऑक्झिन्स कमी केल्यामुळे कळ्या फुटण्यास मदत होते. इथेफॉन फवारणीच्या वेळी ५ ते ६ दिवसआधी पाणी पूर्णपणे बंद करावे. यामुळे बागेला ताण बसून पाने कमकुवत होतील. पानगळ लवकर होण्यास त्याचा फायदा होईल. बागेला पाण्याचा ताण व्यवस्थित बसला नसल्यास पानगळ उशिरा होईल. इथेफॉनच्या वापराचे वेलीच्या

पानगळीमध्ये दिसून येणारे परिणाम व फायदे :

१) पाने पिवळी होतात व नंतर हळूहळू गळून खाली पडू लागतात.

२) ७ ते ८ दिवसांमध्ये जवळपास ८० टक्के पाने गळून पडतात.

३) पानातील अन्नघटक, कार्बोहायड्रेट आदी घटक काडीत साठवले जातात. त्यानंतर छाटणी करून हायड्रोजन सायनामाइड पेस्ट केले जाते. त्यानंतर डोळे फुटून बाहेर आल्यानंतर काडीमध्ये साठवलेली अन्नद्रव्ये उपयोगी पडतात.

४) फुटवे एकसमान येतात. पानगळीसाठी काय करावे? - खत व पाणी यांचे योग्य नियोजन करून छाटणीपूर्वी आठ दिवसांनी दोन्ही गोष्टी सुरू कराव्यात. - इथेफॉनची मात्रा ७ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात द्यावी.

- वातावरणाचा व्यवस्थित अंदाज घेऊन प्रखर सूर्यप्रकाश असतानाच पानगळ करावी.

- पानगळीच्या वेळी निवडक काड्या डोळे तपासणीसाठी काढाव्यात. काडी तपासणीच्या निष्कर्ष यानुसार छाटणी करावी. काय करू नये?

-छाटणीच्या आठ दिवस आधीपासून पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

- दोनदा इथेफॉनचा वापर करणे टाळावे. - ढगाळ हवामानात पानगळ करू नये.

- या काळात बोदाचे काम करू नये.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com