Pesticides Banned Agrowon
ॲग्रो विशेष

Pest Control Regulations: बंदी असलेली कीटकनाशके पेस्ट कंट्रोलसाठी वापरू नये

Pesticides Banned: पेस्ट कंट्रोलसाठी बंदी असलेली कीटकनाशके वापरल्यास परवाने रद्द होतील आणि कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना प्रमाणित आणि सुरक्षित कीटकनाशके वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यावसायिकांनी बंदी असलेल्या अॅल्युमिनियम फॉस्फाईडसारख्या कीटकनाशकांचा वापर केल्यास संबंधितांवर कीटकनाशके कायदा १९६८ व कीटकनाशके कायदा १९७१ मध्ये असलेल्या तरतुदींनुसार संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. परवाने रद्द करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी पेस्ट कंट्रोल धारकांना दिले.

कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी हवेली यांच्या वतीने पुणे शहर व परिसरातील पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यावसायिकांचा प्रशिक्षण वर्ग व आढावा सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, अभिजित तेली, डॉ. सारंग सावलेकर, गुरुप्रसाद आगवणे, हिरामण राठोड, विनोद चव्हाण, अरुण शर्मा आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे व ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वेगवेगळ्या पेस्टची संख्या वाढत असल्यामुळे घरगुती पेस्ट नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पेस्ट कंट्रोल व्यवसाय करताना केंद्रीय कीटकनाशक बोर्ड, फरिदाबाद यांनी प्रमाणित केलेली कीटकनाशके विहित शिफारशीत केलेल्या मात्रेतच वापर करावीत.

तसेच पेस्ट कंट्रोल करताना सर्व व्यावसायिकांनी ग्राहकांना पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन करावे. अॅल्युमिनियम फॉस्फाईड, इथिलीन ब्रोमाईड, मिथिल ब्रोमाईड सारख्या बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर करु नये. त्यामुळे विषबाधेच्या दुर्दैवी घटना घडत आहे.

तमिळनाडू राज्यामध्ये कुंद्राथुर येथे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर यांनी पेस्ट कंट्रोल करताना उंदिर मारण्याचे औषध प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे दोन मुलांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील पेस्ट कंट्रोल परवानाधारक यांनी कीटकनाशके कायदा १९६८ व कीटकनाशके कायदा १९७१ मधील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले की, हवेली तालुक्यातील पुणे शहर व परिसरातील पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांनी परवाना घेताना उगम प्रमाणपत्रात नमुद केल्याप्रमाणेच कीटकनाशकांचा वापर करावा. विषबाधेच्या दुर्दैवी घटना या पुणे शहरात घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

नियम, अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच परवाने

अनधिकृत व परवाना नसलेल्या पेस्ट कंट्रोल ऑपरेटर व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या नियम व अटींची पुर्तता करीत असलेल्या व विहित शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत असलेल्या व्यक्तींनाच पेस्ट कंट्रोल परवाने दिले जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT