Agricultural Fraud : बनावट कीटकनाशके विक्रेत्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय

Fake Pesticides Issue : राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करीत बाजारात बनावट कीटकनाशके विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांना नेमके कसे रोखायचे या बाबत कृषी विभागदेखील संभ्रमात आहे.
Agricultural Pesticides
Agricultural PesticidesAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करीत बाजारात बनावट कीटकनाशके विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांना नेमके कसे रोखायचे या बाबत कृषी विभागदेखील संभ्रमात आहे.

उत्तर महाराष्ट्रात अलीकडेच कृषी विभागाच्या स्थानिक गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी दोन ठिकाणी धाडी घालून १४ लाखांहून अधिक किमतीची कीटकनाशके जप्त केली आहेत. आधी या टोळ्या ग्रामीण भागात कमी साक्षरता असलेल्या तालुक्यांमध्ये किंवा दुर्गम भागात बनावट कीटकनाशके विक्री करीत होत्या.

Agricultural Pesticides
Illegal Pesticides : साडेनऊ लाखांची अवैध, विनापरवाना कीटकनाशके जप्त

परंतु आता शहरी व निमशहरी बाजारात देखील या टोळ्यांकडून बनावट कीटकनाशके विकली जाऊ लागली आहेत. नाशिकच्या अंबड भागातून साडेनऊ लाखांची अवैध कीटकनाशके जप्त केली आहेत. त्यापूर्वी जळगावमधील कृषी विभागाच्या पथकाने भुसावळ शहरात देखील एक मोठी कारवाई केली. तेथे इंडोफिलसारख्या नामांकित कंपनीच्या नावे बोगस कीटकनाशके विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, इंडोफिल कंपनीचे एम-४५ हे बुरशीनाशक शेतकऱ्यांमध्ये अनेक दशकांपासून लोकप्रिय आहे. त्याचा फायदा घेत भुसावळमध्ये बोगस बुरशीनाशक विकणारी एक टोळी सक्रिय झाली. या टोळीने सदर कंपनीचा लोगो, ब्रँड नेम, समान रंग संगती असणारी पाकिटेदेखील तयार करून घेतली होती. जिल्हा गुणनियंत्रण पथकातील विकास बोरसे व विजय पवार यांनी ही माहिती मिळाली होती.

Agricultural Pesticides
Pesticide Disposal Costs Issue : प्रतिबंधित कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा खर्च विक्रेत्यांवर

त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही टोळी जेरबंद करण्यासाठी नियोजन करण्यात आले. पथकाने टाकलेल्या छाप्यात बुरशीनाशकाची एक हजार पाकिटे, बनावट वेष्टणे, पॅकेजिंगची सामग्री असे पावणेचार लाख रुपयांचे घबाड सापडले आहे.

‘‘शेतकऱ्यांपर्यंत बनावट निविष्ठा जाणार नाही याची काळजी कृषी सेवा केंद्रचालक व गुणनियंत्रण अधिकारी हे दोन घटकच घेऊ शकतात. अधिकृत व मूळ कीटकनाशके निर्मिती करणाऱ्या कोणत्याही कंपनीकडे गावनिहाय नजर ठेवणारी यंत्रणा नाही,’’ असे कीटकनाशक उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कुंपणच शेत खाते आहे...

कृषी आयुक्तालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले, की बनावट कीटकनाशकांबाबत गुप्त माहिती मिळताच कारवाई केली जातेच; मात्र अशी माहिती गावपातळीपासून कृषी सेवा केंद्रचालकांनी जागरूकपणे पाठवायला हवी. कारण परिसरात नेमके काय चालू आहे याविषयी केंद्रचालकाला बारकाईने माहिती असते. परंतु अनेकदा केंद्रचालक या टोळ्यांना सामील होत असल्यामुळे शेतकरी वर्ग फसवला जातो. कुंपणच शेत खात असल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मर्यादा येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com