Pune News : केंद्र सरकारने २०२३-२४ मध्ये 'नमो ड्रोन दीदी योजने'तून महाराष्ट्रातील ४७ महिला बचत गटांना ड्रोनसाठी अनुदान दिले, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिली. या योजनेतून देशातील १५ हजार महिला बचत गटांना ड्रोन अनुदान वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे..या योजनेसाठी २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी १ हजार ६१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परंतु देशभरात २०२३-२४ या वर्षात प्रमुख खत कंपन्यांच्या माध्यमातून केवळ १ हजार ९४ ड्रोन अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये नॅनो खतांच्या फवारणीसाठीच्या ५०० ड्रोनचा समावेश आहे..संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदार ओम राजेनिंबाळकर, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे आणि श्रीरंग बारणे यांनी नमो ड्रोन दीदी योजने संदर्भात अतारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तरात केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी बंगळूर येथील संस्थांच्या अहवालाचा हवाला देत सदर योजनेमुळे महिलांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले..Namo Drone Didi Scheme: ‘नमो ड्रोन दीदी’ योजना अंमलबजावणीसाठी समिती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा करून नमो ड्रोन दीदी योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेमुळे शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासह ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण शक्य होईल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. परंतु केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून या योजनेतून ड्रोन वाटपाला गती मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे १५ हजार ड्रोन वाटपाच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे..नमो ड्रोन दीदी योजनेतून ड्रोनच्या खरेदी किमतीपैकी ८० टक्के म्हणजेच ८ लाख रुपये केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. यामध्ये स्प्रे यंत्रणा, बॅटरी, कॅमेरा, प्रशिक्षण, विमा, देखरेख खर्चाचा समावेश असतो. तसेच एका व्यक्तीला १५ दिवसांचे, तर कुटुंबातील इतर सदस्यांना ५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. ड्रोन वापरामुळे कामात आधुनिकता आली असून, महिलांच्या उत्पन्नातील वाढीसह ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्याचा दावा कृषी राज्यमंत्र्यांनी केला आहे..Namo Drone Didi Scheme : ग्रामीण विकास आणि महिलांच्या रोजगारासाठी सरकारची "नमो ड्रोन दीदी योजना".महिला बचत गटांना प्रोत्साहननमो ड्रोन दीदी योजनेसोबतच दिनदयाल अंत्योदय योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी आणि कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेतून महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच विविध यंत्र व अवजारे खरेदीसाठी अनुदान, कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याचे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे..महाराष्ट्रात आस्ते कदमनमो ड्रोन दीदी योजनेतून अहिल्यानगर, बीड, पुणे, नाशिक, सांगली, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ तर अकोला, धुळे, जालना, कोल्हापूर, परभणी, धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी २ ड्रोन महिला बचत गटांना वितरीत करण्यात आले आहे.. तर उर्वरित १७ जिल्ह्यांत प्रत्येकी एक ड्रोन वाटप करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.