Maharashtra Rain agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : गहू, कांदा, हरभरा, आंबा, काजू पिकांचे वादळी पावसाने नुकसान, राज्यात आणखी पावसाची शक्यता

Stormy Rains Konkan : राज्यात सलग दोन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. अकोला, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सिंधुदुर्गसह मराठवाड्यात वादळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

sandeep Shirguppe

Stormy Rains Maharashtra : राज्यात सलग दोन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. अकोला, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर, जालना, बीड, सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक आंब्यासह नाचणी, काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. तर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाने गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले. नागपूरमध्ये बुधवारच्या मध्यरात्री अचानक वादळी पाऊस झाला यामध्ये झाडे उन्मळून पडले तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला.

विदर्भातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये वळीव पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक फटका वर्धा जिल्ह्याला बसला. येथे सकाळी साडेआठपर्यंत तब्बल २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी (ता.२) दुपारनंतर नाशिक, बागलाण, कळवण तालुक्यांना गारपिटीसह मुसळधार पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिकांना मोठा फटका बसला. केळी उत्पादक आणि द्राक्ष बागायतदारांना यांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात २४ तास अरिंज अलर्ट देण्यात आला होता.

पुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांत सोसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अहिल्यानगरमध्ये कांदा गव्हाचे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात बुधवारी (ता.२) दुपारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ओढे नाले वाहू लागले असून, शेतांमध्ये पाणीच पाणी साचले होते. हातातोंडाशी आलेल्या सर्व पिकांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, माळेगाव, रंधा, वाकी, पिंपरकणे, मानिकोझर, रुंभोडी, इंदोरी या भागातही पाऊस झाला.

मराठवाड्यात चार दिवस पाऊस

मराठवाड्यात बीड, जालना जिल्ह्यात सोमवारी(ता.३१) रोजी वादळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान आणखी चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यभरात हवेचा दाब वाढत असल्याने मराठवाड्यात तीन आणि चार एप्रिलला पावसाची शक्यता आहे.

कोकणात मुसळधार पुढचे दोन दिवस पावसाचे

वैभववाडी आणि कणकवलीच्या काही परिसरात वादळी पाऊस झाला. वैभववाडी शहरात आठवडा बाजाराला आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली तर फिरत्या विक्रेत्यांनाही चांगलाच फटका बसला. ढगांचा गडगडाट आणि गारपीट झाल्याने आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडत असून, आणखी चार दिवस पावसाचे सावट राहणार आहे.

सांगली कृषी केंद्रातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली

राहुरी (जि. अहिल्यानगर) अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या येथील कृषी संशोधन केंद्र मौजे डिग्रज हद्दीतील फलोत्पादन विभागाच्या २ एकर क्षेत्रावर नारळाची ३७ वर्षांची बाग आहे. सायंकाळी नारळ बागेतील दोन झाडांवर वीज कोसळून झाडांनी पेट घेतला. तसेच मिरजेतील काही भागात झालेल्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT