Pune News: पशुपालन व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यानंतर आता कृषीच्या धर्तीवर सवलतीच्या दरात वीज पुरवठ्यासह, कर्जावरील व्याज सवलत देखील देण्यात येणार आहे. ही सवलत लघू व मध्यम स्वरूपाच्या पशुपालन व्यवसायाला असणार आहे. याबाबतती माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली..डॉ. देवरे म्हणाले, ‘‘पशुपालन व्यवसाय हा स्वतंत्र व्यवसाय न मानता कृषी व्यवसायच समजण्यात यावा, यासाठी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांना शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला आहे..Robot in Livestock Management: आता 'रोबोट' करणार गोठ्यातील कामे.यानुसार विविध सवलती देण्यात येणार असून, यामध्ये कृषी क्षेत्राला ज्याप्रमाणे वीज सवलत आहे. त्याप्रमाणे पशुपालन व्यवसायाला सवलत मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायत कोर आकारणीबरोबरच कृषी कर्जाच्या व्याज सवलती देखील मिळणार आहेत..Livestock Insurance: केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा....या आहेत अटीवीज सवलत मिळण्यासाठी पशुपालकांनी जिल्हा उपायुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारकसर्व पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यकवीज वितरणद्वारे स्वतंत्र मीटर बसविणे बंधनकारक....यांना असेल सवलत२५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मांसल कुक्कुट पक्षी५० हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादन पक्षी४५ हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट१०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ पशुधनाचा गोठा५०० किंवा त्यापेक्षा कमी शेळ्या, मेढ्यांचा गोठा२०० किंवा त्यापेक्षा कमी वराहपालन युनिटपशुपालन प्रकल्पातील पशुगृह, चारा, पशुखाद्य, पंप, प्रक्रिया व शितगृहासाठी सवलतीच्या दरात वीज वापर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.