Akola News: गेल्या खरीप हंगामात शासनाने राबविलेल्या हमीभाव ज्वारी खरेदीत घोळ झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. सुमारे पाच हजार ३८४ क्विंटल ज्वारी ही सात-बारावर पीकपेरा नसतानाही खरेदी करण्यात आली आहे. सुमारे एक कोटी ८० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचीही ज्वारी खरेदी दाखविण्यात आलेली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी खरेदीदार संस्थांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने पुन्हा एकदा शासकीय खरेदीचे गुऱ्हाळ चर्चेत आले आहे..२०२४-२५ च्या खरीप हंगामात हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी अकोल्यात ११ केंद्रे मंजूर करण्यात आली होती. यापैकी सात केंद्रांवर ज्वारी खरेदी करीत असताना १९३ शेतकऱ्यांचे मूळ सात-बारे एडिट केलेले आढळून आले होते. या सात-बारावर पीकपेरा नसतानाही ५३८४.५९ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होती..Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई.ज्वारी खरेदी करताना पीकपेरा, सातबारा या नोंदी ऑनलाइन तपासण्याची जबाबदारी संबंधित खरेदीदार संस्थांना दिलेली होती. या प्रकरणात संबंधित तहसीलदारांकडून सात केंद्रांवरील एडिट केलेल्या सातबारा व ज्वारी खरेदीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर झालेला आहे..Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीत अनियमितता.यानुसार संत नरसिंग महाराज फार्मर कंपनी (मुंडगाव-अकोट) च्या केंद्रावर ६९ सात-बारावर १७७९ क्विंटल, वक्रतुंड शेतकरी कंपनी (तेल्हारा) केंद्रावर ४२ सात-बारावर १४५५.५८ क्विंटल, अकोला खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर ३४ सात-बारावर १०८१.५० क्विंटल, बार्शीटाकळी खरेदी विक्री केंद्रावर १३ सातबारे आणि २६० क्विंटल, अकोट खरेदी विक्री संघावर १५ सातबारे आणि ४५७ क्विंटल, अॅग्रीस्टॉक शेतकरी कंपनी (कवठा) च्या केंद्रावर १९ सात-बारावर ३३८ आणि बाप्पा मोरया कंपनीच्या (कान्हेरी गवळी) केंद्रावर एका सात-बारावर १३ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली दाखवण्यात आली आहे. .खरेदीदार संस्थांविरुद्ध कारवाईचे आदेशया प्रकरणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संत नरसिंग महाराज शेतकरी कंपनीला (मुंडगाव अकोट) पाच वर्षांसाठी काळ्यात यादीत टाकत त्यांनी खरेदी केलेल्या ज्वारीचे कमिशन संस्थेला देऊ नये, असे आदेश दिले आहेत. तर अकोला, बार्शीटाकळी, अकोट खरेदी विक्री संघ, वक्रंतुड शेतकरी कंपनी (तेल्हारा), अॅग्रीस्टॅक कंपनी (निंबा फाटा) यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. .त्यांनी खरेदी केलेल्या ज्वारीचे कमिशनसुद्धा त्यांना अदा न करण्याचे म्हटले आहे. बाप्पा मोरया कंपनीला यापुढे अनियमितता होणार नाही, अशी ताकीद दिली आहे. शिवाय ८५ शेतकऱ्यांचे प्रलंबित ज्वारी चुकारे त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मीना यांनी नुकतेच काढलेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.