Pune News: कृषी विभागातील कार्यकारी व अकार्यकारी पदांचा घोळ कायमचा निकालात निघाला आहे. कोणतेही महत्त्वाचे अधिकार नसलेली पदे आता ‘अकार्यकारी’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. .सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर किंवा शिस्तभंग तसेच विभागीय चौकशीत अनेक वेळा कृषी अधिकारी किंवा कर्मचारी निलंबित होतात. निलंबनानंतर त्यांना सेवेत घेताना ‘अकार्यकारी’ पदावरच नेमा, असे आदेश राज्य शासनाने २०११ मध्ये दिलेले आहेत. परंतु कृषी विभागात अकार्यकारी पदे नेमकी कोणती हेच निश्चित नव्हते. त्यामुळे निलंबन प्रकरणांमध्ये पद देताना वर्षानुवर्षे गोंधळ चालू होता..Agriculture Department LOGO : कृषी विभागाचं नवीन 'बोधचिन्ह' आणि 'घोषवाक्य' ठरलं; राज्य सरकारचा निर्णय.हा गोंधळ कायमचा मिटविण्यासाठी पदांची वर्गवारी करण्याचा निर्णय आस्थापना विभागाचे उपसचिव व सहसंचालकांनी घेतला. त्याबाबत उपसचिवांनी कृषी आयुक्तालयातील सर्व संचालकांची अलीकडेच एक बैठक घेतली होती..यात प्रत्येक संवर्गातील अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, लोकसंपर्क, वित्तीय व प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजुरींचे अधिकारांवर चर्चा झाली. त्यानंतर अकार्यकारी पदे निश्चित केली गेली. कृषी विभागाचे कार्यसन अधिकारी विशाल टेके यांनी काढलेल्या आदेशात पदे नमूद करण्यात आली आहेत..Agriculture Department: कृषी विभागातील अधिकाऱ्यांना १३ हजार सिम कार्डचे वाटप.उपकृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रिय स्तरावरील २१३९ पदे आता कार्यकारी असतील. मात्र कार्यालयांमधील ६४८ उपकृषी अधिकारी अकार्यकारी असतील. कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट ‘ब’मधील कनिष्ठ राजपत्रित संवर्गातील ६४० पदेही अकार्यकारी असतील. त्यात ३५१ कृषी अधिकारी (सामान्य) तसेच विशेष घटक योजनेतील २८९ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे..त्यांना कोणतेही प्रशासकीय व वित्तीय अधिकार नसतील. बीज प्रमाणीकरण यंत्रणेतील ८९ पदे, कृषी आयुक्तालयासह सहसंचालक, एसएओ व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांची सध्याची २५६ पदेदेखील अकार्यकारी ठरविण्यात आली आहेत. मात्र, पुण्याच्या स्मार्टमधील ५७ व मुंबईच्या पोकरामधील २६ पदांना कार्यकारी दर्जा मिळाला आहे..तालुका कृषी अधिकारी आता ‘कार्यकारी’राज्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याची ३५१ पदे आता कार्यकारी स्वरुपाची असतील. ‘एसएओ’ व ‘टीएओ’ हे दोघेही ‘कार्यालय प्रमुख’ कार्यकारी पदांवर असतील. मात्र, आत्मामधील ३३ प्रकल्प उपसंचालकांना यापुढे अकार्यकारी पदांचा दर्जा असणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.