Maharashtra Ropeway Project: गडकिल्ल्यांसह ४५ पर्यटनस्थळे रोप-वेने जोडणार!

Ropeway in Forts: महाराष्ट्रातील दुर्गम गड-किल्ले आणि महत्त्वाची पर्यटनस्थळे रोप-वेने जोडली जाणार आहेत. कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, माथेरानसह ४५ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार असून, राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन (एनएचएलएमएल) आणि राज्य शासन यांच्यात करार झाला आहे.
Ropeway Project
Ropeway ProjectAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, माथेरानसह चढाई अवघड असलेली ४५ ठिकाणी रोप-वेने जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांची अवघड वाट आता सोपी होणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन (एनएचएलएमएल) आणि राज्य शासन यांच्यात याबाबत करार झाला आहे.

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम-पर्वतमालाची घोषणा झाली होती. या कार्यक्रमातून डोंगराळ प्रदेश, शहरातील गर्दीची ठिकाणे, दुर्गम भागांना रोप-वेद्वारा जोडण्याचा संकल्प केला होता. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला होता.

Ropeway Project
Agriculture Development: समतोल विकासाचा सर्वोत्तम पर्याय

त्यामुळे पर्वतमालांतर्गत रोप-वे कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन (एनएचएलएमएल) आणि राज्य शासन यांच्यात याबाबत करार झाला आहे. त्यानुसार आता राज्य शासनामार्फत १६ ठिकाणी तर राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन (एनएचएलएमएल) यांच्याकडून २९ ठिकाणी रोप-वे कार्यान्वित होणार आहेत. रोप-वे उभारले जाणाऱ्या ठिकाणची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल तर ती राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनाला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर हस्तांतर होईल. इतर विभागांच्या मालकीची असेल तर ती सार्वजनिक बांधकामकडे घेतली जाईल.

कळसूबाई हे १,६४६ मीटर उंचीचे राज्यातील सर्वांत उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेले हे शिखर दुर्गप्रेमींसाठी वर्षभर आकर्षणाचे केंद्र आहे. कळसूबाई शिखराजवळ भंडारदरा धरण, रतनगड, सांदण दरी आणि घाटघरचा कोकण कडा ही पर्यटन स्थळे आहेत. भंडारदऱ्याचा निसर्ग, धबधबे आणि पावसाळ्यातील सौंदर्य यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी (कानिफनाथ) आणि बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील श्रीमच्छिंद्रनाथ (मांयबा) ही महत्त्वाची दोन स्थाने रोप-पेने जोडली जाणार आहेत.

Ropeway Project
Rural Development : धुळगावने साधला शेतीसह ग्रामविकास

रोप-वे होणारी ठिकाणे

रायगड, माथेरान, कुणकेश्‍वर, अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला, घारापुरी एलिफंटा लेणी (सर्व रायगड जिल्हा), खंडोबा निमगाव, सिंहगड, जेजुरी (पुणे जिल्हा), महाबळेश्‍वर, प्रतापगड, परळी किल्ला सज्जनगड, उरमोडी धरण ते कास पठार, सातारा शहर ते अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, उत्तरेश्‍वर मंदिर वेळणे, मांढरदेवी, आणि धोमधरण, वाई (सर्व सातारा जिल्हा), रेणुकामाता मंदिर माहूर (नांदेड), बाणकोट किल्ला मंडणगड, केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली, गोवा किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला (रत्नागिरी), महादेवगड पॉइंट, सावंतवाडी (सिंधुदुर्ग), माहुलीगड (ठाणे),

सनसेट पॉइंट (पालघर), (सातारा), गगनगिरी मंदिर, गगनबावडा (कोल्हापूर), राजगड किल्ला, शिवनेरी किल्ला, अष्टविनायक मंदिर, दऱ्याघाट पळु, भीमाशंकर ज्योतीलिंग (पुणे), पन्हाळा ज्योतिबा, विशाळगड (कोल्हापूर), हरिहर किल्ला, ब्रह्मगिरी ते अंजनेरी, मांगीतुंगी, चंद्रेश्‍वर महादेव मंदिर (नाशिक), कळसूबाई शिखर, हरिंचंद्रगड (अहिल्यानगर), तोरनमाळ (नंदुरबार), हनुमान टेकडी, वेरुळ लेणी ते म्हैसमाळ, अंजिंठा गाव ते अजिंठा लेणी (छत्रपती संभाजीनगर), श्रीक्षेत्र मढी ते श्रीक्षेत्र मचिंद्रनाथगड (अहिल्यानगर, बीड) नागपूर कनेक्टिंग मेट्रो स्टेशन आणि लंडन स्ट्रीट, रामटेक (नाशिक), गोसेखुर्द धरण (भंडारा).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com