Chiku  Agrowon
ॲग्रो विशेष

Chiku Orchard Issue : वादळी पावसाचा चिकू बागायतदारांना फटका

Team Agrowon

Palghar News : मुसळधार पावसाचा व वादळी वातावरणाचा पालघर जिल्ह्यातील व विशेषतः डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, पुढील सहा महिने चिकू उत्पादनावर जोरदार फटका बसला आहे. अशा परिस्थितीत डहाणू तालुक्यात चिकू बागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे १० हजार कामगारांना पुढील सहा महिने पोसायचे कसे, हा पेच देखील निर्माण झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यांत दोन वेळा वादळी वातावरणासह मुसळधार पाऊस झाल्याने चिकू झाडावरील फुले व फळांचे नुकसान झाले होते. त्या पाठोपाठ दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. यामधून लागवड क्षेत्रातील काही भाग सुटला असताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग तीन-चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमध्ये उर्वरित क्षेत्र देखील बाधित झाले आहे.

सद्यःस्थितीत चिकू झाडांवरील फुले, लहान आकाराचे चिकू (बटन) व मोठ्या आकाराचे चिकू यांची बहुतांशपणे गळ झाली असून, सडणाऱ्या चिकूचा सर्व बागांमध्ये सडा पडलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांच्याकडून सत्य परिस्थितीचा अहवाल दिला गेला नसल्याचा आरोप बागायतदारांकडून होत आहेत. तर सप्टेंबर अखेरीस पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे पालकमंत्र्यांनी आश्‍वासन दिले असले तरी प्रत्यक्षात सर्व्हेक्षण सुरू झाले नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

नवरात्रीच्या सुमारास डहाणू येथील बाजारपेठेत दररोज ३०० टन चिकू येणे अपेक्षित असताना बुधवारी (ता.२) जेमतेम सव्वाशे टन चिकूची आवक झाल्याची माहिती चिकूचे घाऊक व्यापारी प्रीत पाटील यांनी दिली आहे. या सुमारास दररोज प्रत्येक बागायतदार कर्मचारी ८० ते ९० किलो चिकू वेचत (खुडत) असताना त्यांच्याकडून फक्त २० ते २५ किलो चिकूचे उत्पादन होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उत्पादक संघाचे सरचिटणीस मिलिंद बाफना यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले. मुसळधार पाऊस व वादळी हवामानामुळे चिकू झाडावरील फूल व फळ गळतीमुळे चिकूच्या उत्पादनावर पुढील पाच ते सहा महिने मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होईल, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बागायतदार समोर दुहेरी संकट

पालघर जिल्ह्यात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रफळावर चिकू लागवड असून त्यापैकी डहाणू तालुक्यातील ४००० हेक्टर लागवडीचा समावेश आहे. या लागवडीसाठी फळ झाडावरून वेचणे, धुणे, सुकवणे व त्याचे पॅकिंग करणे यासाठी अंदाजे १० हजार कामगार या भागात कार्यरत असून या श्रमिकांना पुढील पाच महिने कोणत्या प्रकारचे काम द्यावे हे बागायतदारांसमोर संकट उभे राहिले आहे. या कामगारांना वाडीतून सुट्टी दिल्यास व ते लगतच्या औद्योगिक पट्ट्यात कामाला लागल्यास पुन्हा बागायतीमध्ये कामास येणार नाही, अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यांना पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियमित पगार देणेदेखील बागायतदारांसाठी त्रासदायक ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT