Council of Grape Growers Association : द्राक्ष बागायतदार संघाची उद्यापासून तीन दिवसीय परिषद

Grape Council and Annual Gathering : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची तीन दिवसीय द्राक्ष परिषद व वार्षिक मेळावा शनिवारपासून (ता. २४ ते २६) पुण्यात होत आहे.
Sharad Pawar and Shivrajsingh Chauhan
Sharad Pawar and Shivrajsingh ChauhanAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची तीनदिवसीय द्राक्ष परिषद व वार्षिक मेळावा शनिवारपासून (ता. २४ ते २६) पुण्यात होत आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गलगतच्या वाकड भागातील हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल येथे होत असलेल्या या परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता.२४) सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान भूषविणार आहेत.

Sharad Pawar and Shivrajsingh Chauhan
Grape Disease : द्राक्ष पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज करपा’

केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘पुणे बंद’चे आयोजन करण्यात आलेले असले, तरी या परिषदेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन द्राक्ष संघाने केले आहे.

Sharad Pawar and Shivrajsingh Chauhan
Grape Farmer Fraud : द्राक्ष व्यापाऱ्यांकडून २२ लाखांचा गंडा

द्राक्ष परिषदेसाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रिय रंजन, राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे तसेच ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव यांना देखील निमंत्रित करण्यात आलेले आहे. परिषदेच्या तांत्रिक चर्चासत्रात देश विदेशातील शास्त्रज्ञ तसेच प्रयोगशील बागायतदार सहभागी होणार आहेत.

शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी व निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधी या वेळी उपस्थित असतील. परिषदेच्या निमित्ताने प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेमधील तांत्रिक चर्चासत्रे समाप्त होताच सोमवारी (ता. २६) बागायतदार संघाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभेला शिवाजी पवार, कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे आदी पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com