Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न

heavy Rain Crop Loss : वादळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल शासनास त्वरित सादर केला जाईल.

Team Agrowon

Nanded News : वादळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल शासनास त्वरित सादर केला जाईल. बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, अर्धापूर शिवार, लहान शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी नुकतीच पालकमंत्री सावे यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदींची उपस्थिती होती.

अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तत्काळ करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानुसार येत्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा अहवाल सादर करून नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्धापूर तालुक्यातील चिंचबन येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेट्टे, अर्धापूर शिवारातील व्यंकटराव साखरे, लहान शिवारातील गिरीश कल्याणकर व विठ्ठल इंगळे यांच्या शेतात जाऊन केळी व पपई या पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.

या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील केळी या पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे खासदार अशोक चव्हाण यांनी या वेळी केली. यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

Yeola Water Scarcity: येवल्यात टंचाईची झळ तीव्र; ५५ टँकर फेऱ्यांवर पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT