Manoj Jarange  Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange : मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणासाठी घराबाहेर पडा

Maratha Reservation Update : ‘‘आपल्या लेकराला आयुष्याचे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी मराठा समाजाने घरातून बाहेर पडावे,’’ असे आवाहन करत आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही.

Team Agrowon

Satara News : ‘‘आपल्या लेकराला आयुष्याचे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी मराठा समाजाने घरातून बाहेर पडावे,’’ असे आवाहन करत आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही. जास्त त्रास दिला, तर हा लढा मुंबईला नेण्याची आमची तयारी आहे. गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळावे म्हणून हा लढा सुरू आहे. सरकारचा बाप येऊ द्या, मी मरायची तयारी ठेवली आहे.

सगळ्या संकटाला सामोरे जाण्याची माझी तयारी असून देवेंद्र फडणवीस यांनी षड्‍यंत्रे केली, तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हाटणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सातारा येथे शनिवारी (ता.१०) दिला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही ११३ आमदार पाडून समाजाचे वर्चस्व दाखवून देणार आहोत, असेही स्पष्ट केले.

मनोज जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली शनिवारी साताऱ्यात दाखल झाली. या वेळी गांधी मैदानावर झालेल्या सभेत श्री. जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘मराठ्यांच्या आरक्षणाची ही लढाई साडेअकरा महिन्यांपासून सुरू आहे. काही राजकीय नेत्यांनी हा लढा बंद पाडण्यासाठी सगळ्यांनी ताकद लावली.

पण मराठ्यांना उघडे पडू न देता मी त्या विरोधात उभा आहे. त्यासाठी छगन भुजबळांसारखे नेते विरोधात लावले आहेत. त्यांच्या मदतीला आणखी दहा, पंधरा नेते दिले, पण तेही माझ्याविरोधात कट केला पण तेही गप्प पडले. तुम्ही नेत्यांचे ऐकून घरात बसला तर आरक्षण गेले म्हणून समजा. सभा आंदोलने टीव्हीवर बघू नका, प्रत्यक्ष मैदानात या. समाजाची लेकरे मोठी करायची असतील तर आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

‘...अन कमरेला पट्टा लावला’

मनोज जरांगे यांनी व्यासपीठावर उभे राहून सुमारे तासभर भाषण केले. मराठा आरक्षणातील शेवटच्या आंदोलनामुळे खूप त्रास झाला. अंगातून चमका निघत असून, जास्त वेळ उभे राहून भाषण करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे तीस मिनिटांच्या भाषणानंतर त्यांना उभे राहण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी कमरेला पट्टा बांधून भाषण केले. संपूर्ण भाषण सुरू असताना त्यांना वारंवार त्रास जाणवत असल्याचे दिसून आले. मात्र त्यांनी तसेच भाषण सुरू ठेवले होते. भाषण झाल्यानंतर त्यांना गरगरल्यासारखे वाटू लागल्याने ते जमिनीवर मांडी घालून बसले. त्यानंतर त्यांनी थोडे पाणी प्यायल्यानंतर बरे वाटू लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT