Manoj Jarange : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच आलमट्टी विरोधात लढा उभारणार'

Maratha Reservation : कोल्हापुरात आरक्षण व महापूर अशी दोन संकटे आहेत. त्यात नेते इथल्या जनतेला सुधारू देत नाहीत.
Manoj Jarange
Manoj Jarangeagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood Almatti Dam : ‘‘कोल्हापूरला महापुराने वेढले. दुष्काळाप्रमाणे महापुराने इथली स्थिती भयाण झाली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी (ता. ८) आग लागली. दुहेरी संकटात कोल्हापूरकर आहेत. शेतकऱ्यांच्या छोट्या पिकांचे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर आलमट्टी धरणाविरोधातील लढा उभारला जाणार असल्याचे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण व शांतता जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरी पोहोचल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, आलमट्टी धरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्याकडे पाहा. आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला की, त्याची भिंत खाली सरकवूया. दोन्हीकडचे सरकार शेतकऱ्यांचे वाटोळे होत असताना शांत राहणार असेल, तर जनतेनेच मार्ग काढावा लागेल. आता पंचनाम्यात दोन वर्षे जाणार. तोवर दुसरा पूर येईल. पहिल्या पुराचे पैसे तरी मिळाले का? त्यामुळे या सरकारला पाडून टाका. ही घाण लय दिवस असून चालणार नाही. त्यासाठी लोकांना जागे करा.’’

‘‘मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. सग्या-सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली की, आरक्षणाचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पक्ष, नेत्यांना मोठे करत बसू नका. प्रत्येक वेळी ‘पाहुणा’ आहे म्हणून मतदान कराल, तर तोच मोठा होईल. तुमची मुले उच्चशिक्षित असूनही बेरोजगार राहतील.

गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागणे चुकीचे आहे का? त्यामुळे आता नेत्यांना मोठे करत बसू नका. जात मोठी करा. पोटच्या लेकरांना मोठे करा, असे आवाहन करीत जरांगे- पाटील म्हणाले, ‘‘आरक्षण दिले नाहीतर पर्याय काय? आरक्षणाचा लढा अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरू आहे.

आमदारांचा गट, समन्वयक, संघटनांना फोडले जात आहे. आता लेकरांच्या बाजूने उभे राहा.’’ ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी ताकद लावा. मराठ्यांच्या नेत्यांना मराठ्यांची मुले मोठी व्हावीत, असे वाटत नाही. त्यामुळे एकजूट करा. कोणाच्या नादी लागत बसू नका; अन्यथा संभाव्य नुकसानीला कोणीही जबाबदार राहणार नाही. आरक्षणाचा लढा घराघरांत गेला, तरच आरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange
Kolhapur Agriculture Loss : नुकसान लाखात; मदत हजारात, पूरबाधित शेतकरी आणखी खोलात

नेतेच जनतेला सुधारू देत नाहीत...

कोल्हापुरात आरक्षण व महापूर अशी दोन संकटे आहेत. त्यात नेते इथल्या जनतेला सुधारू देत नाहीत. महापुराने शेतकऱ्याचा घात केला आहे. त्याची त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. आता येत्या काही दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार आणि भरपाई मिळणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

जरांगे-पाटील म्हणतात...

कोल्हापुरात महापूर आला की, सारा महाराष्ट्र तळमळ करतो. शेती साथ देत नाही, सरकार आरक्षण देत नाही. त्यामुळे बारकाईने विचार करूया. मराठ्यांबरोबर मुस्लिम, धनगर आरक्षणाच्या लढाईची तयारी करणार आहे, असे सांगत विरोधी व सत्ताधारी पक्ष मागे लागले आहेत, असे श्री. जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com