Cabinet Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : राज्यात १५ हजार पोलीस पदासाठी होणार भरती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

Maharashtra Cabinet Today : आता राज्य सरकारने मंगळवारी (ता.१२) मंत्रिमंडळ बैठकीत १५ हजार पोलीस पदाच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात नव्याने १५ हजार पद भरती होणार आहे.

Dhananjay Sanap

Cabinet Decision Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीची प्रतिक्षा करत होते. परंतु आता राज्य सरकारने मंगळवारी (ता.१२) मंत्रिमंडळ बैठकीत १५ हजार पोलीस पदाच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात नव्याने १५ हजार पद भरती होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला असल्यामुळे ते बैठकीला ऑनलाईन हजर होते, अशी माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने रायगडचे पालकमंत्री पद तटकरे यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे नाराज मंत्री भरत गोगावले यांनी बैठकीला दांडी मारल्याचे बोलले जात आहे. परंतु गोगावले यांनी मात्र दिल्लीला काम असल्याने जावं लागलं, असं म्हणत चर्चा फेटाळून लावली आहे.

संक्षिप्त निर्णय

-  राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण. (अन्न, नागरी पुरवठा विभाग)

- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय. (विमानचालन विभाग)

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

- महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी. (गृह विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT