थोडक्यात माहिती...१. शेतातील पाणी साचू नये म्हणून तात्काळ निचरा करणे आवश्यक.२. पातेगळ नियंत्रणासाठी NAA 20 PPM (२० मि.ग्रा./लि.) फवारणी उपयुक्त.३. बोंड विकासावेळी DAP २% द्रावण दोनदा फवारणी करावी.४. कॅल्शिअम, बोरॉन, झिंक यांच्या कमतरतेमुळे पातेगळ होते – सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.५. कीड व रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशक/कीटकनाशक फवारणी वेळीच करावी..Rainy Season Crop Care: सतत चालणारा पाऊस आणि हवेतील आर्द्रता यामुळे शेतीचे भरपूर नुकसान होत आहे. कपाशीमध्ये पातेगळ होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पातेगळमुळे पिकाची वाढ असंतुलित होते, उत्पादनात घट, आर्थिक नुकसान होते, त्यामुळे पातेगळवर वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. .पातेगळची कारणेपातेगळच्या कारणांवरुन त्याच्या व्यवस्थापनाचे उपाय करता येतात. पावसाच्या खंडानंतर झालेला अति पाऊस, ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश, जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता आणि कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकामध्ये पातेगळ होते. शेतात पाणी साचून राहिल्याने पिकाला अन्नद्रव्ये शोषणात अडचणी येतात. सोबत मुळांना ऑक्सिजनही मिळत नाही आणि नैसर्गिकरीत्या पातेगळ होते. .Cotton Pest Control: कपाशी पिकावर येणाऱ्या तुडतुडे आणि फुलकिड्यांची लक्षणे आणि प्रभावी उपाययोजना .पातेगळची लक्षणेअन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या आणि इतर तणावांमुळे कपाशीच्या पातेगळमुळे पिकाची पाने पिवळी पडतात. पिकाला लागलेली पाते आणि नवीन तयार होणारी बोंडे अचानक गळून पडतात. किंवा काहीवेळेस बोंडे झाडावरच सडण्याची समस्या दिसते. पातेगळमुळे कपाशीच्या उत्पादनात घट होते. .पातेगळसाठी व्यवस्थापनशेतातील पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. निचरा करण्यासाठी उताराच्या बाजून चर खोदून घ्यावे. कपाशीवरील पातेगळ थांबवण्यासाठी नॅप्थिल अॅसिटिक अॅसिड (एनएए) २० पी.पी.एम. म्हणजेच २० मिलीग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मात्र या फवारणीच्या द्रावणात इतर कोणतेही मिश्रण नसावे. तसेच फुले लागणे आणि बोंड विकासाच्या अवस्थेत डीएपी २ टक्के म्हणजे २० ग्रॅम प्रती लिटर पाण्यात या प्रमाणात दोन आठवड्यांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. .कपाशीवरील पातेगळ अनेकदा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेसुद्धा पातेगळ होते. प्रामुख्याने कॅल्शिअम, बोरॉन, आणि झिंक यांच्या कमतरतेमुळे पातेगळ होते.यासाठी फुले द्रवरूप ग्रेड २ मायक्रोन्यूट्रीयंट पाच मिली प्रती लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच बोरॉन १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कपाशीतील पातेगळ कीड आणि रोगांमुळेसुद्धा होते त्यामुळे कीड रोगांची लक्षणे दिसताच त्यावर बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करावी..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs): १. कपाशीमध्ये पातेगळ का होते? अति पाऊस, ढगाळ वातावरण, अन्नद्रव्यांची कमतरता व कीड-रोग प्रादुर्भाव ही मुख्य कारणे आहेत.२. पातेगळ रोखण्यासाठी पहिला उपाय कोणता? शेतातील पाण्याचा त्वरित निचरा करणे हा पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे.३. पातेगळवर कोणते हार्मोन वापरले जाते? नॅप्थिल अॅसिटिक अॅसिड (NAA) 20 PPM पाण्यात मिसळून फवारणी केली जाते.४. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कोणती फवारणी उपयुक्त आहे? ग्रेड-२ मायक्रोन्यूट्रीयंट ५ मि./लि. व बोरॉन १ ग्रॅम/लि. फवारणी करावी.५. बोंड विकासाच्या अवस्थेत काय फवारावे? डीएपी २% द्रावण (२० ग्रॅम/लि.) दोनदा फवारणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.