Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट
Rain Update 2025 : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विर्दभात काही भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.