Sindhudurg News : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत सोमवारी (ता. २९) सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भातपीक कापणी रखडली असून परिपक्व झालेल्या भातपिकांचे नुकसान अटळ मानले जात आहे..जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. परंतु रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. काही भागांत हलक्या सरी पडल्या, परंतु बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली. .Paddy Crop Damage: परिपक्व झालेले भातपीक नुकसानीच्या उबंरठ्यावर.वैभववाडी, कणकवलीच्या पूर्वपट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तर सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या तालुक्यांतही पावसाच्या सरी पडत आहेत. वेंगुर्ला, मालवण, देवगड किनारपट्टीवरदेखील पावसाचे वातावरण आहे. .Paddy Disease : विक्रमगडमध्ये भातपिकावर करपा रोग.या भागात पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगदेखील वाढला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भातपीक कापणी रखडली आहे. .दोन ते तीन हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व होऊन पंधरा दिवस झाले आहेत. त्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातील पीकदेखील परिपक्व होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भातपीक कापणी वेळेत झाली नाही तर पीक वाया जाण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.