
Mumbai News: सत्ताधारी पक्षातील कलंकित,भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेतली. या वेळी त्यांना निवेदन देऊन कलंकित, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यंमत्री योगेश कदम, मृदा जलसंधारण अधिकारी संजय राठोड, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांना तातडीने बडतर्फ करावे तसेच ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील ७२ सनदी अधिकारी, आजी माजी मंत्री, ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पाच्या निविदा घोटाळाप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच आमदार निवास उपहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण करणारे संजय गायकवाड, अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली.
कृषिमंत्री कोकाटे यांचे अधिवेशनादरम्यान मोबाइलवर रमी खेळल्याचे दृश्य समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे.
ही घटना विधानसभेच्या शिस्तीचा व संसदीय प्रतिष्ठेचा भंग आहे. तसेच सिन्नर येथे दौऱ्यावर असताना नुकसानीच्या पंचनाम्याबबात ढेकळाचे पंचनामे करायचे का, असे बोलून उपमर्द केला आहे, असे वक्तव्य करणारे मंत्री खाते कसे सांभाळणार, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आईच्या नावे डान्स बारचा परवाना असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यामुळे राज्याची मान खाली गेली आहे. हनीट्रॅप प्रकरणात ७२ सनदी अधिकारी चर्चेत असून आजी-माजी मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी मृदा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर पैशांच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप केला आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. तसेच गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंना ठोकून काढा, अशी भडकावू वक्तव्ये केली आहेत, त्यांना तत्काळ बडतर्फ करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात आमदार अनिल परब, मिलिंद नावेर्कर, महेश सावंत, अनंत नर, उपनेते बबनराव थोरात, सुषमा अंधारे आदींचा समावेश होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.