Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cluster : बंद मँगो क्लस्टर सुरू करा

Mango Processing : केंद्र सरकारच्या योजनेमधून पावस येथे सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून मॅंगो क्लस्टर उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आंब्यावर प्रक्रिया केली जाते.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : येथील मँगो क्लस्टर बंद असून ते सुरू करावे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे, अशी मागणी पावस परिसर अंबाबाई बागायतदार संघाच्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी केली. याविषयी आचारसंहिता संपल्यानंतर सर्व मंत्र्यांना भेटून चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

ही बैठक पावस येथील झुलेखा दाऊद काजी हायस्कूलमध्ये झाली. केंद्र सरकारच्या योजनेमधून पावस येथे सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून मॅंगो क्लस्टर उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आंब्यावर प्रक्रिया केली जाते. ते बंद असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा नाही. ते लवकरात लवकर सुरू करावे अशी चर्चा बैठकीत झाली. त्या क्लस्टरमध्ये आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध आहे.

तसेच नव्याने शेतकऱ्यांना सभासद करून घेतले तर त्याचा लाभ या परिसरातील आंबा बागायतदारांना घेता येणार आहे. यासाठी शासनस्तरावर मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पावस परिसरासह ठिकठिकाणी कॅनिंगसाठी आंबा खरेदी केला जात आहे. आंबा साठवणूक करणाऱ्या केंद्रांची नोंद पोलिस, कृषी विभाग व आंबा बागायतदार संघटनेकडे अपेक्षित आहे. त्यांनाही परवानगी घेणे बंधनकारक केले पाहिजे.

आंबा संकलन केंद्र हा पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत आणला पाहिजे. आंबा विकायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आंबा कोणाकडून खरेदी केला जातो, त्याचे नाव, तारीख आणि तो आंबा किलोवर विकणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असलेली नोंद वही घातली पाहिजे. आंबा घेणाऱ्यांना आणि ज्यांच्याकडून आंबा घेतला आहे. किलोने आंबा घेणाऱ्यांनी सायंकाळी साडेसातनंतर आंबा घेणे बंद करावे असे निर्णय शासनस्तरावर झाले पाहिजेत अशी चर्चा या वेळी करण्यात आली.

या बैठकीला पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी, उदय बने, मुसद्दीक मुकादम, अक्रमशेठ नाखवा, मंगेश साळवी, सचिन आचरेकर, नंदकुमार मोहिते, रवीकिरण तोडणकर, सुरेंद्र देवळेकर, दत्ताराम तांबे, अरविंद मांडवकर, सुनील लाड, तेजस मुळे, चंद्रवधन शिंदे, प्रसाद शिंदे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर, उमंग साळवी आदी उपस्थित होते.

आंबा चोरी रोखण्यासाठी गुरखे

गेल्या काही वर्षांपासून नेपाळी गुरख्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, त्याला प्रमुख कारण म्हणजे कॅनिंगसाठी किलोवर आंबा घेतला जातो. काही जण विविध भागांमध्ये आंबा चोरी करून तो किलोवर विकतात.

त्याच्यामुळे अनेक आंबा बागायतदारांनी बागांमध्ये सुरक्षेसाठी गुरखे ठेवले आहेत. त्यामुळे चोरी करणे शक्य होत नसल्याने गुरख्यांवरील हल्ले वाढले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे, तसेच या बाबत कठोर कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरून खून, दरोडे, चोरी याला प्रतिबंध होईल, असे मत संघाच्या सभासदांनी मांडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT