RCB Victory Fally Agrowon
ॲग्रो विशेष

RCB Rally Crowd Chaos : ‘आरसीबी’च्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी; ११ जणांचा मृत्यू

IPL Celebration: बंगळूरमध्ये ‘आरसीबी’च्या आयपीएल विजयी रॅलीदरम्यान नियंत्रणाहीन गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार केला, मात्र दुर्घटना टाळता आली नाही.

Team Agrowon

Banglore News: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने ‘आयपीएल’चा अंतिम सामना जिंकल्यानंतर बुधवारी (ता. ४) बंगळूरमध्ये काढलेल्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत.

अहमदाबाद येथे मंगळवारी (ता. ३) आयपीएलचा अंतिम सामना झाला. त्यानंतर बंगळूरमध्ये बुधवारी रॅली काढण्यात आली. या वेळी चाहत्यांची संख्या प्रचंड होती आणि त्यांना आवरणे पोलिसांना अवघड झाले. मिरवणूक काढण्याचे नियोजन आखले गेले होते. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यात चेंगराचेंगरी झाली.

‘आरसीबी’चा संघ बुधवारी दुपारी २ वाजता बंगळूरमध्ये दाखल झाला आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले. त्यानंतर खेळाडूंचा सत्कार समारंभ विधान भवन येथे पार पडला. तेथेही प्रचंड गर्दी होती आणि नियोजित कार्यक्रमानुसार बंगळूरचा संघ तिथून चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार होता. पण विधान भवन येथे सत्कार सोहळा सुरू असताना चाहत्यांची स्टेडियमवर गर्दी उसळली.

४० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमच्या बाहेर जवळपास ४ ते ५ लाख लोकांनी गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रोखण्यासाठी फक्त ५००० पोलिस सुरक्षेसाठी तैनात होते. गर्दी आवाक्याबाहेर गेली असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. गेटजवळ घडलेल्या या प्रसंगात चेंगराचेंगरी झाली.

या प्रकरणाबाबत डी. के. शिवकुमार यांनी सांगितले, की १८ वर्षांनंतर ‘आरसीबी’ने जेतेपद जिंकले याचा आम्हाला अभिमान आहे. कोहलीच्या एकनिष्ठेचे फळ मिळाले. पण संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. गर्दीला आवरणे अवघड झाले होते. मी यासाठी बंगळूर आणि कर्नाटकच्या लोकांची माफी मागतो. आम्हाला मिरवणूक काढायची होती, पण गर्दी अनियंत्रित झाली. त्यामुळे मिरवणूक रद्द करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT