
Ahilyanagar News: अकरा टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाण्याचा अकोला, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यांना लाभ होतो. २६ टीएमसीच्या मुळा धरणातून केवळ राहुरी, नेवासा तालुक्यातीलच शेतीला पाणी मिळते.
मुळा धरणाचे पाणी हे पाथर्डी, शेवगाव तालुक्यांच्या हक्काचे पाणी असून या धरणातून शेतीला पाणी मिळावे यासाठी योजना करावी, अशी मागणी राज्य ऊस तोडणी कामगार, मजूर मुकादम संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
राज्य ऊस तोडणी कामगार, मजूर मुकादम संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांच्यासह अर्जुन पाखरे, अनिल थोरे, निवृत्ती थोरे, शरद वारे, अशोक थोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी श्री. विखे पाटील यांची सोमवारी (ता. १४) भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांच्या पूर्व भागांमध्ये नेहमी शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत या भागांना शेतीसाठी मुळामधून पाणी मिळावे या मुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.
मुळाचे पाणी पाथर्डी शेवगाव तालुक्याला देण्यासाठी योजना केली तर ती कमी खर्चाची योजना असेल. कारण मुळा धरणापेक्षा पाथर्डीची उंचीही ११० मीटरने कमी आहे. त्यामुळे हे पाणी पांढरीच्या पुलापर्यंत जमिनी खालून व पुढे जमिनीवरून आता येईल. यातून अहिल्यानगर तालुक्यातील खोसपुरी, पांगरमल, आव्हरवाडी, उदरमल, सोकेवाडी तसेच पाथर्डी तालुक्यातील मिरी,
कडगाव, शिंगवे केशव, ओडमोहोज, शिराळ चिचोंडी, धारेवाडी, कोल्हार, चिचोंडी, डोंगरवाडी, गीतेवाडी, डमाळवाडी, भोसे घ्या शीवारातून राघूहिवरे, मांडवा, कोल्हार खाडंगाव, पुढे देवराई, सातवड, त्रिभुवनवाडी, निंबोडी, कौडगाव, घाटशिरस, शिरापूर, करडवाडी, पारेवाडी, तिसगांव, मढी, निवडुंगे, देवी धामनगाव, बाभळगाव, हत्रा सैदापूर, डांगेवाडी, खेर्डे, पागोरी पिंपळगाव, सांगवी, सोमठाणे, निपाणी जळगाव, चांदगाव, माळेगाव, वाळूज, आगसखांड, अकोला,
धायतडकवाडी, पालेवाडी, शेकटे, फुंदेटाकळी, येळी, पिंपळगव्हाण, कोरडगाव, मुखेकरवाडी, कोळसांगवी, कळसपिंपरी, तोंडोळी, सोनोसी, कोनोसी, जिरेवाडी, नांदूर निंबादैत्यपर्यंत तसेच शिरसाटवाडी, मोहरी तारकेश्वरगड व मोहटादेवी गडाच्या मधून बोगद्यातून मोहटे, करोडी मार्गे तिनखडी, भिलवडे, जांभळी, टाकळी मानूर, तांबेवाडी, गाडेवाडी, टेंभूर्णी मार्गे ढगेवाडी, बोधेगांव, बालमटाकळीपर्यंत पाणी मिळू शकते, असे थोरे पाटील यांनी सांगितले.
वाहून जाणारे पाणी वळवा
या संदर्भात गहिनीनाथ थोरे म्हणाले, की अकोले तालुक्यातील डोंगर माथ्यावरून सुमारे १७ टीएमसी पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. निपाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवून राहणार टाकले तर मुळा धरणाची साठवण क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढेल. ही योजना राबविली तर अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, गेवराई तालुक्यातील दुष्काळी भागाला या पाण्याचा फायदा होईल. माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. ती योजना मार्गी लावावी, अशी मागणी विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.