Agriculture Success Story: पडीक माळरानावर झेंडू-भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

Farmer Success: वर्धा जिल्ह्यातील आमगाव मदनी येथील शेतकरी अभय ढोकणे यांनी प्रयोगशीलतेच्या जोरावर पडीक माळरान सुपीक करत बहुपीक शेतीत यश मिळवले आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

Vegetable Farming: पडीक माळरानावर प्रकल्पातील गाळ टाकत सुपीक केलेल्या क्षेत्रात भाजीपाल्यासह पारंपरिक पिके घेऊन त्या माध्यमातून प्रयोगशीलता जपण्यावर आमगाव मदनी (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी अभय ढोकणे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतीतील आर्थिक जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने एका पिकावर अवलंबून न राहता बहुविध पिके घेण्यावर त्यांच्याकडून भर दिला जात आहे.

...असे आहे आमगाव मदनी

वर्धा जिल्हा मुख्यालयापासून १७ किलोमीटरवर असलेल्या आमगाव (मदनी) या गावाची लोकसंख्या जेमतेम १००० आहे. शेती, दुग्ध व्यवसायावर आधारित गावशिवाराचे अर्थकारण. त्यामुळे गावात सुबत्ताही आहे. याच गावात ढोकणे यांचे १३ एकर शेतीक्षेत्र. खरिपात यातील तीन एकर कापूस, चार एकर सोयाबीन, चार एकर ऊस याप्रमाणे तर उर्वरित क्षेत्रावर मिरची, कोबी, टोमॅटो ही पिके घेतली जातात.

Vegetable Farming
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

...अशी आहे बाजारपेठ

गावातूनच काही फुलांची विक्री होते, त्याबरोबरच काही फुलांचा पुरवठा हार, गुच्छ तयार करणाऱ्यांना होतो. यंदा फुलांची उपलब्धता कमी असल्याने सुरुवातीला ८० रुपये किलोचा दर मिळाला. त्यानंतर दर ५० रुपये किलोपर्यंत राहतो. भाजीपाला विक्रीसाठी देखील हाच पॅटर्न राबविण्यात आला. गावातूनच भाजीपाल्याला मागणी राहते. याबरोबरच वर्धा येथील किरकोळ विक्रेत्यांनाही पुरवठा होतो.

शेतकरी गटातून बीजोत्पादन

२०१९ मध्ये अंकुर शेतकरी मंडळाची उभारणी अभय ढोकणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. गटात त्यांच्यासह ११ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे बीज प्रक्रिया केंद्र सेलू येथे आहे. महाबीजकडून २५० रुपये क्‍विंटल बीज प्रक्रियेकामी खर्च आकारला जातो. अंकुर शेतकरी नावाने बियाणे विक्री होते. हरभरा, सोयाबीन बियाण्यांची विक्री गटामार्फत होते. सोयाबीनच्या १०० क्विंटल, तर हरभऱ्याच्या २०० क्‍विंटल बियाण्यांची थेट विक्री केली जाते.

Vegetable Farming
Agriculture Success Story: पारंपरिक शेतीला फळबाग, पशुपालनाची जोड

झेंडू फुलांच्या लागवडीवर भर

२० गुंठ्यांवर झेंडूची लागवड जूनच्या अखेरच्या आठवड्यात होते. कोलकाता येथे पुडी नावाच्या जातीचा झेंडूची ते लागवड करतात. दीड महिन्यात या वाणापासून फुले मिळण्यास सुरुवात होते. दर तीन दिवसांआड २५ किलो याप्रमाणे उत्पादकता मिळते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उत्पादकतेत वाढ होते. सरासरी ५० किलो दर तीन दिवसाआड फुले मिळतात. फुलांची लागवड ४ बाय दीड आकाराच्या बेडवर केली जाते.

साडेपाच एकर शिवार हे माळरान असल्याने त्यात काहीच पिकत नव्हते. बोरखडी प्रकल्पातील तब्बल ५०० ट्रॉली गाळ टाकत ही जमीन वहितीखाली आणली. त्यामुळे आता वहितीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
अभय ढोकणे, शेतकरी, ८९९९२५८०४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com