
Nagpur News: सावनेर तालुक्यातील नांदागोमुख ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचांविरुद्ध पारीत करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्तास स्थगिती दिली आहे. अपात्रतेच्या कारवाईमध्ये एका अपात्र सदस्याने देखील मतदान करीत सहभाग घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, ज्योती नंदराज मोवाडे असे याचिकाकर्त्यांचे नाव असून त्या नांदागोमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. या ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध अलीकडेच अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र अविश्वास ठरावाची प्रक्रिया अवैध आहे.
या प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्य गौरव सदाशिव उईके यांनीही मतदान केले. त्यांचे मतदान अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. उईके यांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्याचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही.
या ग्राम पंचायतीमध्ये एकूण १२ सदस्य असून अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊ मते पडल्याने दोन तृतीयांश या नियमाने ठराव पारीत झाला. मात्र गौरवचे मत अवैध ठरल्यास ठरावाच्या बाजूने दोन तृतीयांशपेक्षा कमी मतदान होईल व हा प्रस्ताव फेटाळला जाईल. यामुळे सरपंच, उपसरपंच आपआपल्या पदांवर कायम राहतील.
या बाबत ग्रामसभा होणे अपेक्षित होते. ती झाल्यास सरपंच तसेच उपसरपंचांचे पद रद्द होईल. मात्र या प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. यावर न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली व तूर्त या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. मोवाडे यांच्या तर्फे ॲड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. नीरज करडे आणि ॲड. तेजस केने यांनी सहकार्य केले.
तूर्तास कुंभारे गटाला दिलासा
भाजपचे काटोल जिल्ह्याध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे नांदागोमुख हे मूळ गाव. कारवाई करण्यात आलेल्या सरपंच ज्योती मोवाडे या कुंभारे गटाच्या असून भाजप समर्थित आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या स्थगन आदेशामुळे तूर्त कुंभारे गटाला दिलासा मिळाल्यासारखे आहे. हे मत अवैध ठरल्यास संबंधित अविश्वास ठरवाच्या बाजूने झालेले मतदान हे दोन तृतियांशपेक्षा कमी होऊन हा ठराव मंजूर होणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.