Maharashtra Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Farmers : 1 लाख ६० रुपयांपर्यंतच्या कर्जाला मुद्रांक शुल्क, राजपत्र प्रसिद्ध

Crop Loan : १ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत.

sandeep Shirguppe

Maharashtra Revenue Department : शासनाच्या महसूल आणि वन विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या कित्येक काळापासून शेती कर्जाच्या १ लाख ६० पर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे. परंतु शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. या निर्णयाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडून अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भार थोडा हलका झाल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १ रुपयांच्या तिकिटावर मिळू शकणार आहे. याचा लाभ नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कर्जावरील खर्च कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, यापूर्वी नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित बँक शाखेकडून दिले जायचे; परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून संबंधित बँकांना दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले की, आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध केले असून, याची अंमलबजावणी करावी, असे आदेश बँकांना दिले आहेत.

१ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, तर केवळ एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल. ही मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख ६० हजारांपर्यंतच्या कर्जासच लागू असणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT