Agriculture Subsidy
Agriculture SubsidyAgrowon

Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

Agriculture Subsidy Update : मॉन्सूनोत्तर पावसामुळे २०२३ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पीकनुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे.

Parbhani News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे २०२३ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पीकनुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. मंगळवार (ता.७) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८९१ शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह पोर्टलवर आहे. पोर्टलवर ८८ कोटी ७४ लाख ७० हजार ८५१ रुपयांचे अनुदान अपलोड करून वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

Agriculture Subsidy
Crop Damage Subsidy : पीक नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित

दरम्यान, अजून ६२ हजार ८९६ शेतकऱ्यांची यादी तसेच ४२ कोटी ५ लाख ८८ हजार ११३ रुपये एवढी रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया बाकी राहिली आहे. २०२३ च्या नोव्हेंबरमधील मॉन्सूनोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ५८० गावांतील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ९५ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रातील ९४ हजार ३३८.४४ हेक्टर पीकनुकसानीबद्दल १२८ कोटी ३० लाख २ हजार ७८४ रुपये, बागायती क्षेत्रातील ७६ हेक्टर ९० पीक नुकसानीबद्दल २० लाख ७६ हजार ३०० रुपये, बहुवार्षिक ६३८ हेक्टर ३३ पीक नुकसानीबद्दल २ कोटी २९ लाख ७९ हजार ८८० रुपये असे एकूण १३० कोटी ८० लाख ५८ हजार ९६४ रुपयांच्या निधी वितरणास शासनाकडून जानेवारीत मंजुरी देण्यात आली.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब

अनुदानाची अदायगी थेट बँक खात्यावर रक्कम जमा करून केली जात आहे. त्यासाठी पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जात आहेत. विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर ई केवायसी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. परंतु ई केवायसी केल्यानंतर दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप असंख्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

मॉन्सूनोत्तर पाऊस अनुदान स्थिती (अनुदान कोटी रुपये)

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर) मंजुर अनुदान पोर्टलवर अपलोड शेतकरी अनुदान अपलोड रक्कम

परभणी ६५ ३३०३० २१३११ २६.९८ ३१७८३ २१.६२

जिंतूर १६९ ६०३७५ १९५६६ २६.६३ १५२६९ ११.१९

सेलू ३० १८५१० ५८१० ७.९० १४००३ ६.१३

मानवत ५३ ३७७२५ ११६१५ १५७९ २८८४८ १३.२५

पाथरी ३१ १०००४ ४१३४ ५.६६ ८४१४ ४.३४

सोनपेठ ५४ २८४६१ ७८०६ १०.६३ २२३९८ ८.३०

गंगाखेड ४२ ११२३ ७४२ १.०४ ९७९ ०.९५१३

पालम ४२ १२२६५ ५३०० ७.२० १४२६० ६.६४

पूर्णा ९४ ३०२९४ १८७६६ २६.९३ ३२९३७ १६.२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com