ST Bus
ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra ST Bus : एसटी प्रवासी वाढले, उत्‍पन्नात मात्र घटच

Team Agrowon

Alibaug News : राज्य परिवहन मंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत (Women ST Bus Ticket Concession) दिल्याने पेण विभागात महिला प्रवाशांची संख्या सुमारे सात हजारांनी वाढली आहे. असे असले तरी रोख उत्पन्नामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

आधीच एसटीला होत असलेल्या तोट्यामुळे रायगड जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील फेऱ्या बंद करून काटकसरीचे धोरण अवलंबावे लागत आहे. या तोट्यात आता सवलतीची भर पडली आहे.

एसटी महामंडळाच्या रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, महाड, मुरूड, माणगाव, श्रीवर्धन असे आठ एसटी बस आगार आहेत.

आगारातून लांब पल्ल्यासह गावे वाड्या-वस्त्यापर्यंत एसटी धावते. जिल्ह्यात वातानुकूलित एसटी बससह निमआराम व साध्या अशा एकूण ५०० बस आहेत.

चालक-वाहकांसह दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. खराब रस्ते नादुरुस्त बसच्या डागडुजीसाठी महामंडळाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.

यातच राज्य परिवहन मंडळाने १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून महिला प्रवाशांकरिता तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. ज्या ठिकाणी खासगी सेवेद्वारे प्रवासाकरिता २० ते ४० रुपये खर्च होत होता, त्या ठिकाणी १० ते १५ रुपयांत एसटी प्रवास होऊ लागला आहे.

जिल्‍ह्यातील ग्रामीण विभागात एसटी बसफेऱ्यांच्या माध्यमातून दररोज एक लाख पाच हजार किलोमीटर इतका प्रवास होत असतो. यामधील भारमान ४२ वरून ४८ गुण इतके वाढले असले तरी यापूर्वी होणारे सुमारे ४५ लाख रुपयांचे रोख उत्पन्न घटून ते ३५ लाख रुपयांपर्यंत आले आहे.

रिक्षाचालकांच्याही उत्पन्नावर परिणाम

सवलतीमुळे महिला प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंत दिल्याने त्याचा रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला आहे. आता ४० टक्के उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालकांसमोर इंधनाचा खर्च, देखभाल-दुरुस्ती तसेच बँकेचा हप्ता भरण्याचे संकट उभे राहिले आहे.

वाढलेल्या रिक्षांची संख्या तसेच सीएनजीच्या वापरामुळे डिझेलवर चालणाऱ्या रिक्षाचालक आणि मालक वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

चैत्र उत्सवानिमित्त विशेष बससेवा

चैत्र महिन्यात विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या देवींच्या उत्सवानिमित्ताने रायगड विभागाने विविध ठिकाणी एसटीच्या विशेष फेऱ्या नियोजित केले आहेत. मुंबई, नालासोपारा, पालघर, विरार येथून जादा एसटी फेऱ्या सोडण्यात येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT