ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : निवडणुकीसाठी एसटी सज्ज

ST Bus : ठाणे जिल्ह्यात १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी निवडणूक विभागाने १०३ एसटी बसची बुकिंग केल्या आहेत.

Team Agrowon

Thane News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यातच या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीची ने-आण या कामासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) विभाग सज्ज झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी निवडणूक विभागाने १०३ एसटी बसची बुकिंग केल्या आहेत. तसेच ठाणे ग्रामीण पोलिसांनी १० बस बुकिंग केल्याने ११३ बस निवडणूक कामकाजासाठी धावणार आहेत.

त्यातच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे परिवहन विभाग असल्याने ही संख्या कमी असल्याचे संबंधित विभागाने सांगितले. जर मागणी झाल्यास एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्धार एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागलेला आहे. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १८ मतदारसंघ आहेत. तसेच जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर अशा एकूण सहा महापालिका आहेत. त्या- त्या महापालिकांच्या परिवहन सेवा कार्यान्वित असल्याने त्यांच्याही बस आहेत.

त्यामुळे निवडणूक साधन सामुग्री ने- आण करण्यासाठी ठाणे विभागाकडे एसटी बसची मागणी ही प्रामुख्याने शहापूर आणि मुरबाड येथून झालेली आहे. यात शहापूरमधून ६५, मुरबाडमधून ३८ अशा १०३ बसची मागणी झाल्याने त्यांची बुकिंगही झाली आहे.

तर ग्रामीण पोलिसांनी १० बसची मागणी केली होती. त्या बस त्यांच्यासाठी रिझर्व्ह केलेल्या आहेत. एसटी विभाग गणेशोत्सव किंवा सण अथवा इतर कामांसाठी जशी सज्ज असते. तशी नेहमीप्रमाणे निवडणूक कामकाजासाठी सज्ज आहे.

ठाणे परिवहनच्या १०५ बस धावणार

ठाणे महापालिका परिवहन सेवा समितीच्या एकूण १७३ बस निवडणूक कामकाजांसाठी १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांत ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दोन मतदारसंघात धावणार आहेत. यामध्ये १०५ टीएमटी बस ठाणे शहर तर ६८ बस कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघासाठी दिल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT