Maharashtra Election 2024 : सरकारने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून ठेवली

Priyanka Gandhi : केंद्र सरकारने लोकांना मदत करायचे सोडून दिले आहे. रोजगार निर्मितीची सर्व साधनेही बंद केली आहेत.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : केंद्र सरकारने लोकांना मदत करायचे सोडून दिले आहे. रोजगार निर्मितीची सर्व साधनेही बंद केली आहेत. दूध, कांदा, सोयाबीन, कापसाला दर न देता शेतकऱ्यांचे हाल केलेत.

कांदा निर्यात बंदी उठवली, पण निर्यात शुल्क का वाढवले? दुसरीकडे शेती साहित्यावर जीएसटी लावून आर्थिक संकटात टाकले आहे. अशा स्थितीत देशातील शेतकऱ्यांना कसे मजबूत करणार, असा प्रश्‍न काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे संगमनेरमधील उमेदवार बाळासाहेब थोरात, शिर्डीतील उमदेवार कषिभूषण प्रभावती घोगरे, कोपरगावातील संदीप वर्पे, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. १६) शिर्डीजवळ साकुरी येथे प्रियंका गांधी यांची सभा झाली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

Priyanka Gandhi
Maharashtra Assembly Election 2024 : शेती प्रश्‍नांना बगल; स्थानिक मुद्द्यांवर निवडणुकीत रंगत

प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्या. पण केंद्र सरकारने महागाई एवढी वाढवून ठेवली आहे, की दीड हजार रुपयांत काय होते? एवढ्या पैशात घर चालतं का? महाराष्ट्रात सर्वाधिक तरुण बेरोजगारांच्या आत्महत्या होत असताना दहा वर्षांत अनेक उद्योग गुजरातला नेल्याने आठ लाख नोकऱ्या बाहेर गेल्या. सहा हजारांपेक्षा अधिक उद्योग बंद पाडले. असे असेल तर महाराष्ट्राला मजबूत कसे करणार?’’

कर्जमाफीवर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘‘दहा वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळत नाहीत. कांदा, कापूस, दूध उत्पादकांची आवस्था वाईट करून ठेवली आहे. सोळा लाख कोटी रुपये उद्योगपतीचे कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला मात्र यांच्याकडे पैसे नाहीत असे सांगतात. काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे.’’

Priyanka Gandhi
Maharashtra Election : ३७० कलमाबाबत नको, शेतकरी आत्महत्या, हमीभावावर बोला

‘‘दोन लाख सरकारी पदे खाली आहेत, ती कधी भरणार? राहुल गांधी आरक्षणाचे विरोधक आहेत, असा खोटा प्रचार ते करत आहेत.’’ पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी कधी भेदभाव केला नाही. लक्ष विचलित करण्यापेक्षा हे लोक वेगळं काही करू शकत नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करतात. धर्माच्या, जातीच्या नावावर भडकविण्याचे काम केले जात आहे. मतदान ही सर्वांत मोठी शक्ती आहे. महाराष्ट्रात असे सरकार पुन्हा येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.’’ प्रियंका गांधी यांनी महाविकास अाघाडीच्या घोषणांचे आश्वासन मतदारांना दिले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com