Drone Flight 
ॲग्रो विशेष

Drone Spraying : आंब्‍यावर ड्रोनद्वारे फवारणी

Agriculture Drone : चढ-उतारावर असलेल्या कोकणातील आंबा बागांमध्ये औषध फवारणीत अनेक अडचणी येतात. सपाट जमीन नसल्याने यांत्रिकीकरणाचा उपयोग करता येत नाही.

Team Agrowon

Alibaug News : चढ-उतारावर असलेल्या कोकणातील आंबा बागांमध्ये औषध फवारणीत अनेक अडचणी येतात. सपाट जमीन नसल्याने यांत्रिकीकरणाचा उपयोग करता येत नाही. त्‍यामुळे रोगराई होऊन फळगळती, उत्‍पादनाचा दर्जा घसरण्याचे प्रकार घडतात. कोकणातील आंबा उत्‍पादकांना दिलासा मिळावा, यासाठी आरसीएफ कंपनीकडून आदिवासी महिलांना फवारणी ड्रोन देण्यात येणार आहेत.

कृषी क्षेत्रात अत्याधुनिकता आणण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे औषध फवारणीची माहिती दिली जात आहे. या उपक्रमाची सुरुवात आदिवासीबहुल जिल्ह्यातून होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि अन्य सूक्ष्म पोषक खतांच्या फवारणीबरोबरच त्‍यांचा संतुलित वापर यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे.

थळ येथील आरसीएफ कंपनी प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गतवर्षी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनाच्या औचित्याने करण्यात आले होते.

ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कोकणात अधिक किफायतशीर होणार असून आंबा बागायतींच्या फवारणीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. ही मोहीम भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध मंत्रालयांमार्फत राबवण्यात येत असून कोकणातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्‍यास प्रतिसाद दिला आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही आदिवासी महिलांना ड्रोन देण्यात आले असून प्रात्‍यक्षिकेही दाखवण्यात आल्‍याची माहिती आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी दिली आहे.

ड्रोनद्वारे फवारणीमुळे पैशाची बचत

रायगड जिल्ह्यात आंबा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. डोंगर-उतारावर आंब्‍याची लागवड केली जात असून बागेच्या प्रत्येक कोपऱ्यात यंत्राद्वारे फवारणी शक्य नाही. यासाठी जादा मजूर लागतात. शिवाय, वेळही जातो. आंबा पिकावर काही ठरावीक दिवसाने कीटकनाशक फवारणी करावी लागत असून ती परवडतही नाही; मात्र ड्रोनद्वारे योग्य पद्धतीने फवारणी होईल. यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT