Pune News : नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे देशातील कृषी क्षेत्रात क्रांती होत आहे. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे मत, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न तथा सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले आहे. ते मंगळवारी (ता. २४) धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कृषी मेळाव्याच्या उद्घाटना वेळी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याचप्रयत्नांचा भाग म्हणून ड्रोनचा वापर करण्यासाठी सबसिडी दिली जात असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. उच्च दर्जाचे बियाणे विकसित करण्यासाठी विद्यापीठांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. याकामी मोठी तरतूद करण्यात आल्याचेही प्रल्हाद जोशी म्हणाले. यावेळी प्रल्हाद जोशी यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर कृषीपंपाचा वापर करावा, असे आवाहन प्रल्हाद जोशी यांनी केले.
तसेच धानासाठी हमीभाव १ हजार ३१० रूपयांवरून २ हजार ३२०, ज्वारीसाठी ३ हजार ४२० रुपये करण्यात आली आल्याची माहिती देखील प्रल्हाद जोशी यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि शेतीला अधिक फायदेशीर उद्योग बनविण्यासाठी सर्व पावले उचलण्यास कटिबद्ध असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
कृषी मेळावे फक्त शेतकरी आणि व्यापारीच नाही तर सर्व स्तरातील लाखो लोकांना आकर्षित करत आहेत. कृषी क्षेत्रात झापाट्याने बदल होत असून यांत्रिकीकरण वाढत आहे. विविध कंपन्यांनी विविध प्रकारच्या शेती उपकरणांचे प्रदर्शन करणारे स्टॉल उभारले आहेत. बऱ्याच कंपन्या अवजड यंत्रसामग्रीवर ईएमआय (सुलभ मासिक हप्ता) ऑफर करत आहेत. तर या मेळाव्याचे मुख्य आकर्षण हे लहान शेतकऱ्यांना मजुरांच्या कमतरतेवेळी उपयोगी पडणारी छोटी शेती उपकरणे आहेत. याशिवाय अनेक बियाणे आणि सुधारित पीक जातीच्या कंपन्याही शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत. फुलशेती हा एक फायदेशीर व्यवसाय बनला असून सरकारकडून अनुदान दिले जात असल्याने फुलांचे स्टॉल्स आणि हायटेक गार्डनिंग वाढल्याचेही प्रल्हाद जोशी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.