Chilly Crop Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Chilly Crop Disease : मिरची पिकातील ‘पानावरील ठिपका रोग’

Crop Protection : मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: फ्युझारियम मर रोग, फायटोप्थोरा रोग, ॲन्थ्रॅक्नोज, जिवाणूजन्य करपा, भुरी रोग, विषाणूजन्य मोझॅक अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव सर्व मिरची उत्पादक भागांमध्ये दिसून येतो.

Team Agrowon

राहुल वडघुळे

Agricultural Remedies : मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: फ्युझारियम मर रोग, फायटोप्थोरा रोग, ॲन्थ्रॅक्नोज, जिवाणूजन्य करपा, भुरी रोग, विषाणूजन्य मोझॅक अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव सर्व मिरची उत्पादक भागांमध्ये दिसून येतो. आज मिरची पिकातील पानावरील ठिपका या रोगाविषयी माहिती घेऊ. महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच संदर्भ असावा. या आधी हा रोग महाराष्ट्रात आढळण्याची नोंद बहुतेक नसावी. हा रोग माणसाच्या त्वचेवर पण आढळून आला आहे. आणि त्वचेवर हा अॅलर्जी करतो.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : पानावरील ठिपका रोग

रोगाचे कारण : हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

शास्त्रीय नाव : Corynespora casiicola

बुरशीचे फायलम : Ascomycota

परजीवी प्रकार : Necrotrophic Parasite

नुकसान : या रोगामुळे पिकाचे १० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके : ही बुरशी जवळपास ५३० प्रकारच्या झाडांवर रोग निर्माण करते. जसे की सोयबीन, कपाशी, काकडी, पपई, रबर, टोमॅटो, वाल इत्यादी.

पोषक वातावरण : तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस, अति जास्त आर्द्रता आणि २० ते ४० तास ओलसर पाने राहणे असे वातावरण रोगाच्या वाढीस अत्यंत पोषक असते.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बीजाणू यामध्ये कोनिडिया आणि क्लामाडोस्पोर हे जमिनीत, जुने पीक अवशेष, गवत किंवा सोयाबीन, कपाशी, पपई, टोमॅटो, काकडी इत्यादी पिकांवर जिवंत राहतात. ते २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. नंतर वारा, कीटक, पाणी यांच्या मार्फत यजमान पिकांवर प्रसार होतो. पोषक वातावरण तयार निर्मिती झाल्यावर मुख्य पिकावर लागण होते. याला ‘प्राथमिक लागण’ म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांत लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमधील ठिपक्यांवर अनेक बीजाणू (कोनिडिया) तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जाऊन रोगाचा प्रसार होतो. यालाच ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

या रोगाचे बीजाणू (कोनिडिया) सूक्ष्मदर्शिकेखाली स्पष्टपणे पाहू शकतो. या बीजाणूंचा तळाचा भाग गोलाकार असून, वरील भाग निमुळता होत जात लांबट आकाराचे असतात. यामध्ये पेशी भित्तिका स्पष्टपणे दिसतात. तळाच्या भागावर एक काळसर भाग स्पष्टपणे दिसतो. हे बीजाणू सूक्ष्मदर्शिकाखाली पारदर्शी दिसतात.

लक्षणे

रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानांवर तसेच फळे आणि फांदी यावर देखील दिसून आली आहेत.

सुरुवातीला जमिनीलगत असलेल्या पानांवर लक्षणे दिसतात. नंतर वरील भागातील नवीन पानांवर लक्षणे दिसू लागतात.

फळांवर गर्द तपकिरी, तर फांद्यांवर काळे चट्टे दिसतात.

पानाच्या मध्यभागी पांढरे त्याच्या बाजूला तपकिरी आणि त्या बाजूला गर्द तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसतात. शक्यतो खालील पानांवर मोठे, तर वरच्या पानांवर लहान ठिपके असतात. या ठिपक्यांच्या बाजूने फिक्कट पिवळसर कडा दिसून येते. ठिपक्यांमधील पांढऱ्या भागावर तडा गेलेला दिसतो, तर बऱ्याच वेळा तेथील भाग गळून गेलेला दिसतो. ठिपके पडलेली पाने नंतर वाळून गळून पडतात.

पानगळ होताना, सुरुवातीला खालील पाने गळतात व नंतर वरील भागातील पाने गळतात.

नियंत्रणाचे उपाय

पीक फेरपालट करावी.

अगोदरचे पीक हे या रोगास बळी पडणारे नसावे.

लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.

लागवडीमध्ये रोपांची जास्त गर्दी नसावी.

अति पावसात लागवड टाळावी.

दव पडत असेल तर ते जास्त वेळ पानावर राहणार नाही याची काळजी घ्यावी.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

शिफारस केलेली बुरशीनाशकांचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT