Cotton Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : खारपाण पट्ट्यात कपाशीवर ‘स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव

Spodoptera Infestation : अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात कपाशी पिकावर तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली असून, शेकडो एकर पीक संकटात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात कपाशी पिकावर तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली असून, शेकडो एकर पीक संकटात आले आहे. अळीचा प्रादुर्भाव दर दिवसाला वाढत चालला असून झाडांसह बोंडांचे ही अळी नुकसान करीत असल्याने उत्पादन घटीची चिन्हे तयार झाली आहेत. शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांच्या फवारण्या घेत असताना फारसा परिणाम मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, या भागात कृषी तज्ज्ञांनी भेट देऊन अळीच्या प्रादुर्भावाची पाहणी केली आहे.

सध्या अकोट, दर्यापूर या खारपाणपट्ट्यांतील कापूस उत्पादक गावांमध्ये कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. विविध गावशिवारात ही अळी कपाशीचे पीक पोखरत आहे. दिवाळीनंतर अळीचा प्रादुर्भाव भराभर वाढला. रात्रीच्या काळात अळी सक्रिय होऊन पिकाचे अतोनात नुकसान करीत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांनी ही स्पोडोप्टेरा लिट्युरा अळी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे.

कोरडवाहू कपाशी लागवड केलेल्या या खारपाण पट्ट्यातील कपाशीचे पीक आता कसे तरी सुधारू लागले होते. आधीच सलग पावसाने अनेक ठिकाणी वाढ थांबली होती. आता पाऊस उघडल्यानंतर व थंडीचा प्रभाव वाढू लागल्याने पिकाची स्थिती सुधारत होती. काही शेतांमध्ये पिकात फूल, पात्यांची स्थिती तर काही ठिकाणी बोंड परिपक्व व्हायला सुरुवात झाली होती. अशा महत्त्वाच्या अवस्थेत अचानक या अळीचा उपद्रव सुरू झाला आहे.

यंदा हंगामाच्या सुरुवातीला अकोला जिल्ह्यात एका विशिष्ट कंपनीच्या कापूस वाणासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे, काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ते बियाणे वाटप केल्याचे प्रकार संपूर्ण राज्याने बघितले होते. याच भागात लागवड झालेल्या कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळीने उच्छाद घातला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

कपाशीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांचा वापर करीत आहेत. परंतु नियंत्रण म्हणावे तसे मिळत नाही. रात्रीच्या वेळी ही अळी सक्रिय होऊन प्रचंड नुकसान करीत आहे. यंदा चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण झाली होती. मात्र अळीच्या प्रादुर्भावाने त्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. त्यातच काही कृषी निविष्ठांचा दर्जा दुय्यम असून फारसा प्रभावी परिणाम मिळत नसल्याचेही वाटते आहे.
अनुप साबळे पाटील, कापूस उत्पादक, तरोडा, ता. अकोट, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT