Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : द्राक्षाच्या गोडी बहर छाटण्यांना वेग

Grape Pruning Methods : नाशिकमध्ये गोडी बहर छाटण्यांच्या कामांना वेग आला आहे. जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत छाटण्या पूर्ण झाल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष उत्पादक पट्ट्यात यंदा जुलैपासून सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत पावसाने मोठा खंड दिला. संभाव्य पाण्याची टंचाई बघता द्राक्ष उत्पादकांनी ऑक्टोबरमध्ये केल्या जाणाऱ्या छाटण्यांना यंदा दोन आठवडे अगोदरपासूनच सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये या कामांना वेग आला आहे. जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत छाटण्या पूर्ण झाल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात दीड लाख हेक्टरपर्यंत द्राक्ष लागवडी आहेत. त्यात सप्टेंबरअखेर गोडी बहर छाटण्यांना वेग येत असतो. मात्र निफाड, दिंडोरी, चांदवड, येवला, सिन्नर तालुक्यांत पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे लवकर छाटणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान अनेक भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सुरुवातीला मोठे पाऊस होतील असे चुकीचे हवामान अंदाज वर्तविण्यात आले. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कामे हाती घेतली. मात्र पाऊस न झाल्याने छाटणी कामांनी गती घेतली.

आता पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ती गती कमी केली आहे. काही ठिकाणी अद्यापही धरणे भरणे बाकी आहे. विहरीत अद्याप पाणी उतरलेले नाही. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक तर काही भागात कमी आहे.

मागील वर्षी आगाप छाटण्यांमध्ये द्राक्ष उत्पादकांना चांगले दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पंधरा दिवस अगोदर छाटणी नियोजन केले. त्यामुळे छाटणी कामांना वेग आला आहे.
- अनंत मोरे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड
दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी छाटणीची कामे मागील महिन्यापासून हाती घेतली. त्यामुळे कामांना गती आली. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे धरणे भरली. आता पुढील टप्प्यात पुन्हा ही गती कमी होऊन छाटण्या टप्प्याटप्प्याने होतील.
- रवींद्र निमसे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT